मोड आलेल्या मुगाची उसळ (mood alelya moongachi usal recipe in marathi)

Deepali Bhat-Sohani
Deepali Bhat-Sohani @deepali_5780

मोड आलेल्या मुगाची उसळ (mood alelya moongachi usal recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५ मिनिटे
४ सर्व्हिंग
  1. 2 कप- हिरवे मूग (मोड काढून घ्या)
  2. 1- कांदा (मोठा)
  3. 1- टोमॅटो (मोठा)
  4. 1/2 कप- ओलं खोबरं
  5. 2 टीस्पून- आलं लसूण पेस्ट
  6. 2 टीस्पून- लाल तिखट
  7. 1 टीस्पून- हळद
  8. 2 टीस्पून- धने जीरे पूड
  9. चवीनुसार- मीठ
  10. 1 टेबलस्पून- तेल
  11. 4-5पाने - कडीपत्ता
  12. 1 टीस्पून- गरम मसाला
  13. 1 टेबलस्पून- कोथिंबीर (बारीक चिरलेली)

कुकिंग सूचना

२५ मिनिटे
  1. 1

    आदल्या रात्री हिरवे मूग स्वच्छ धुवून भिजत घाला.

  2. 2

    दुसऱ्या दिवशी स्वच्छ फडक्यात बांधून मोड येऊ द्या.

  3. 3

    आत्ता एका भांड्यात तेल गरम झाले की त्यात कांदा, कडीपत्ता घाला.

  4. 4

    कांदा छान गुलाबी भाजला की त्यात आलं लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद आणि धने जीरे पूड घालून परतून घ्या.

  5. 5

    मसाला परतून झाला की त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालून, मीठ आणि मोड आलेले मूग घाला.

  6. 6

    मूग चांगले परतून झाले की त्यात पाणि घालून शिजत ठेवा.

  7. 7

    दुसऱ्या भांड्यात ओलं खोबरं खरपूस भाजून घ्या.

  8. 8

    भाजलेल खोबरं मिक्सर मधून बारीक वाटून घ्या.शिजलेल्या मुगाच्या ऊसळीत हे वाटण घाला.

  9. 9

    एक उकळी द्या, वरून गरम मसाला आणि कोथिंबीर घाला.मुगाची उसळ तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Deepali Bhat-Sohani
Deepali Bhat-Sohani @deepali_5780
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes