रस्सम (rasam recipe in marathi)

Shital Muranjan
Shital Muranjan @shitals_delicacies

#GA4
#Week12
#Rasam
साऊथ स्टाईल टोमॅटो रस्सम भात सोबत किंवा नुसते प्यायलाही खूप छान लागते. नक्की करून पहा.

रस्सम (rasam recipe in marathi)

#GA4
#Week12
#Rasam
साऊथ स्टाईल टोमॅटो रस्सम भात सोबत किंवा नुसते प्यायलाही खूप छान लागते. नक्की करून पहा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 3मध्यम टोमॅटो
  2. 1/4 कपतूर डाळ
  3. 2 टीस्पूनचिंच
  4. 1 टीस्पूनगूळ
  5. 1 टीस्पूनतिखट
  6. 1 टीस्पूनरस्सम मसाला
  7. चवीपुरते मीठ
  8. फोडणीसाठी
  9. 2 टेबलस्पूनतेल
  10. 1/2 टीस्पूनमोहरी
  11. 1/2 टीस्पूनउडीद डाळ
  12. 1/4 टीस्पूनहिंग
  13. 1/8 टीस्पूनहळद
  14. 6-7 मेथी दाणे
  15. कढीपत्ता

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    प्रेशर कुकरमध्ये तूर डाळ एक कप पाणी घालून शिजवून घ्यावी. डाळ शिजली कि त्यातील पाणी काढून घ्यावे. डाळ चेपून जेवढे शक्य तेवढेपाणी काढावे. एका पातेल्यात टोमॅटो उकडून घ्यावेत व थंड झाल्यावर मिक्सर मधून वाटून घ्यावे.
    अर्धा कप गरम पाणी त्यात चिंच भिजत ठेवावी. दहा मिनिटांनी चिंचेचा कोळ काढून घ्यावा.

  2. 2

    पातेल्यात तेल गरम करावे. उडीद डाळ, मेथी दाणे घालावेत. नंतर मोहोरी, हिंग, हळद, कढीपत्ता घालावा. यामध्ये वाटलेले टोमॅटोचे मिश्रण व शिजवून घोटून घेतलेली डाळ घालून नीट एकजीव करून घ्यावे.

  3. 3

    यामध्ये चिंचेचा कोळ, मीठ, गूळ घालून मिक्स करावे.

  4. 4

    आता यात तिखट व रस्सम मसाला घालून पाच मिनिटे उकळवावे. चव पाहून तिखट, मीठ, चिंच अड्जस्ट करावे.

  5. 5

    रस्सम भाताबरोबर किंवा नुसते सुपसारखे प्यायलाही खुपच छान लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shital Muranjan
Shital Muranjan @shitals_delicacies
रोजी
Follow to learn Awesome Delicacies to bring sweetness to your life n your loved ones|Homebaker|Author|foodblogger|Creative||vegetarian| |Food Photography | |Love for Cooking baking|
पुढे वाचा

Similar Recipes