शाही फ्रुटखंड (shahi fruit khand recipe in marathi)

Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
Pune

#CookpadTurns4 शाही फ्रुटखंड हा खरं तर अगदी अलिकडच्या काळातला पदार्थ. श्रीखंडाइतका काही त्याला पूर्व इतिहास नाही. श्रीखंड तसे पारंपारिक पदार्थात येते.महाराष्ट्रातील घराघरात लोकप्रिय असलेले हे श्रीखंड....याला नैवेद्याच्या पानातही अग्रस्थान आहे.काहीवेळा चक्का घरीही करता येतो.मलईयुक्त दही पातळ फडक्यात बांधून टांगून ठेवून त्यातील पाणी पूर्ण निथळले की चक्का तयार होतो.याला इंग्रजीत hung curdम्हणतात. पण आता गृहिणींना वेळेअभावी शक्य नसते,त्यावेळी तयार चक्का मिठाईच्या दुकानातूनही आणता येतो.खरं तर विकतच्या तयार श्रीखंडापेक्षा घरी चक्का आणून श्रीखंड करण्याची मजा काही औरच!
श्रीखंडाचेच भावंडं म्हणजे आम्रखंड....जे आंब्याच्या सिझनमध्ये आमरस घालून व आंब्याच्या फोडी घालून करता येते.तो केशरी रंग आणि चव केवळ अप्रतिम!
कालांतराने श्रीखंडाच्या मूळ रुपालाही मेक ओव्हर करुन आम्रखंडाची पुढची आलेली एडीशन म्हणजे फ्रुटखंड!! जर आंबा घालू शकतो तर इतरही सिझनल फळं घालून बघायला काय हरकत आहे?...या विचाराने हे फ्रुटखंड तयार झाले असावे!!आणि नंतर मोठ्या मोठ्या ब्रँडनेही हे फ्रुटखंड बाजारात आणले आणि अल्पावधीतच ते लोकप्रिय ही झाले.पण स्वतः करण्याची गंमत आपल्यालाच आनंद देते,नाही का?
सगळ्या फळांचा निरनिराळा स्वाद यात उतरल्यामुळे खाताना खूपच मस्त लागते.विशेषतः उन्हाळ्यात तर हे थंड फ्रुटखंड जिव्हातृप्तीचा विशेष आनंद देते!
CookPadच्या चौथ्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून Cook with Fruits या शीर्षकाअंतर्गत मला "शाही फ्रुटखंड" ही रेसिपी सादर करताना अतिशय आनंद होत आहे.CookPad.comला मनःपूर्वक शुभेच्छा!!💐

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३५-४०मिनिटे
४-५ व्यक्ती
  1. 1/2 किलोचक्का
  2. 350 ग्रॅम साखर
  3. 1/2सफरचंद
  4. 1/2पेर
  5. 1चिक्कू
  6. 7-8संत्र्याच्या फोडी
  7. 1/2डाळिंब सोलून
  8. 1/2मोसंबं सोलून
  9. 1केळं
  10. 1छोटी वाटी काजू तुकडे
  11. 10-15बेदाणे
  12. 1 छोटा चमचावेलचीपूड
  13. 1/4 चमचाजायफळ पूड
  14. 8-10केशर काड्या
  15. वरील प्रमाण अर्धा किलो चक्क्यासाठीचे आहे

कुकिंग सूचना

३५-४०मिनिटे
  1. 1

    वरील घटक पदार्थात सांगितल्याप्रमाणे सर्व साहित्य तयार ठेवावे. आंबटपणास कमी असलेला चांगल्या प्रतीचा चक्का घ्यावा.आदल्या रात्री त्यात वरील प्रमाणानुसार साखर घालून मुरण्यास ठेवावे.काही तासांनंतर साखर चक्क्यात विरघळते.आता चक्का व साखर हँडमिक्सरने अथवा पुरणयंत्रातून गाळून/एकजीव करुन घ्यावा.आपण यात फळे घालणार आहोत,त्याची गोडीही यात उतरणार असल्याने साखर कमी घातली आहे.अन्यथा श्रीखंड करताना चक्क्याच्या बरोबरीने साखर घालावी लागते.तशी फ्रुटखंडाला लागत नाही.

  2. 2

    आपल्या आवडीनुसार घेतलेली फळे स्वच्छ धुवून व साली सोलून अगदी बारीक चिरुन घ्यावीत.मी इथे सफरचंद, पेर,संत्रे,मोसंबे,केळ,चिक्कू, डाळिंब इ.फळे घेतली आहेत.उपलब्धतेनुसार,सिझननुसार आवडीची फळे घालता येतात.

  3. 3

    तयार श्रीखंडात आता चिरलेली सगळी फळे - सफरचंद,पेर,डाळिंब, केळ,चिक्कू,संत्रे,मोसंबं असे एकामागून एक घालावीत.त्यानंतर काजू तुकडे,बेदाणे,वेलचीपूड,जायफळपूड घालावे.सगळे मिश्रण हलक्या हाताने डावाच्या सहाय्याने एकत्र करावे.फार हलवू नये.त्यावर सजावटीसाठी केशरकाड्या घालून फ्रीजमध्ये थंड होण्यास ठेवावे.जेवताना किंवा जेवणानंतर डेझर्ट म्हणूनही सर्व्ह करता येते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
रोजी
Pune
सदा सर्वदा योग कुकपँडचा घडावा ।कुकपँड कारणी नवा पदार्थ माझा घडावा ।आवडीने पदार्था सुगरणीने तो करुनी पहावा ।मने जिंकण्या मार्ग पोटातून जावा ।।
पुढे वाचा

Similar Recipes