काजू-बदाम-पिस्ता रोल (kaju badam pista roll recipe in marathi)

अश्विनी वैद्य
अश्विनी वैद्य @cook_27815757

काजू-बदाम-पिस्ता रोल (kaju badam pista roll recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
3  माणसांसाठी
  1. 1 कपकाजू
  2. 1/3 कपबदाम
  3. 1/3 कपपिस्ता
  4. 1/3 कपसाखर
  5. 1/3 कपपाणी
  6. 2 टेबलस्पूनदूध
  7. 2 टेबलस्पूनपिठी साखर
  8. 2 टेबलस्पूनसाजूक तूप
  9. 2-3 ड्राॅप ग्रीन फूड कलर
  10. बटर पेपर
  11. केशर

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    प्रथम काजू मिक्सरमधून वाटून त्याची बारीक पावडर करावी व चाळणीने चाळून घ्यावी. बदाम व पिस्ता यांची सुध्दा वेगवेगळी पावडर करून घ्यावी.

  2. 2

    एका बाऊलमध्ये बदाम, पिस्ता व पिठी साखर घालून चांगले मीक्स करून घ्यावे.

  3. 3

    आता त्यात फूड कलर व दूध घालून मिश्रण एकजीव करून त्याचा गोळा तयार करावा. त्याचे दोन समान भाग करावेत.

  4. 4

    दोन गोळ्यांचे दोन लांबट रोल तयार करून ते फ्रिजमध्ये सेट करायला ठेवावे. गॅसवर एका कढईत साखर व पाणी घालून सतत ढवळत रहावे.

  5. 5

    साखर विरघळल्यावर त्यात काजूची पावडर व साजूक तूप घालून सतत ढवळत रहावे.

  6. 6

    मिश्रण कढईतून सुटायला लागले की गॅस बंद करावा. मिश्रण ताटात थंड करायला ठेवावे. एका बटर पेपरला तूप लावून घ्यावे. पाच मिनिटांनी काजूच्या मिश्रणाचे दोन समान भाग करावेत. एक गोळा घेऊन तो चांगला मळून घ्यावा व त्याची बटर पेपरवर पोळी लाटून घ्यावी. त्या पोळी वर बदाम-पीस्ता रोल ठेवून अलगद रोल तयार करून घ्यावा.

  7. 7

    तसेच दुस-या गोळ्याचे करावे. आता दोन्ही रोल फ्रिजमध्ये सेट करायला ठेवावे. 1/2 तासाने रोल बाहेर काढून त्याचे हवे त्या आकाराचे रोल कट करून घ्यावे. त्यावर केशर ठेवून गार्नीश करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
अश्विनी वैद्य
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes