उपवासाचे थालीपीठ (upwasche thalipith recipe in marathi)

Rajashri Deodhar
Rajashri Deodhar @RBD12072012

#GA4 #week15
राजगिरा या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे. माझी आजी नेहमी घरी राजगिरा लाह्या फोडायची त्यामुळे हे थालिपीठ उपवासाच्या दिवशी जर भाजणी शिल्लक नसेल तर करायची तसेच या राजगिरा लाह्यापासून लाडू चिक्की लाही पीठ भाजणी असे वेगवेगळे प्रकार करायची.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1/2 तास
2-3 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीभिजवलेले साबुदाणा
  2. 1/2 वाटीराजगिरा
  3. 1बटाटा
  4. 1 टेबलस्पूनआलं मिरची कोथिंबीर पेस्ट
  5. 1/2 टीस्पूनजीरे पावडर
  6. चवीनुसारमीठ
  7. 1 टेबलस्पूनदही
  8. गरजेनुसार पाणी
  9. 3-4 टेबलस्पूनतूप

कुकिंग सूचना

1/2 तास
  1. 1

    पॅन गरम करून राजगिरा घालून झाकण ठेवून भाजून घ्या (शक्यतो हँडल असलेल्या पॅनमध्ये राजगिरा लाह्या फोडाव्यात त्यामुळे हलवता येते आणि झाकण ठेवून भाजल्याने राजगिरा लाह्या जास्त उडत नाहीत)

  2. 2

    लाह्या गार झाल्यावर मिक्सर मधून वाटून घ्याव्यात (तयार लाही पीठ दूध साखर किंवा गूळ घालूनही सर्व्ह करू शकतो) बटाटा साल काढून किसून घ्यावा (या किसलेल्या बटाट्या पावडर पासून खीर पण बनवतात)

  3. 3

    एका भांड्यामध्ये राजगिरा लाही पीठ साबुदाणा किसलेले बटाटा मिरची कोथिंबीर आलं याची पेस्ट दही जीरे पावडर मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून एकत्र करून गोळा भिजवून घ्यावा तव्यावर तूप घालून थालिपीठ थापावे आणि दोन्ही बाजूंनी भाजून सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Rajashri Deodhar
Rajashri Deodhar @RBD12072012
रोजी
I Love cooking.. 😋
पुढे वाचा

Similar Recipes