भरल्या वांग्याची भाजी

Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
Pune

आज मला जवळच्या शेतातली एकदम ताजी माझ्या समोरच तोडलेली वांगी मिळाली.किती मस्त वाटले म्हणून सांगू!!🤗 छान जांभळी जांभळी,छोटी छोटी अगदी नाजूक कोवळी...अहाहा!!
थंडी आणि वांग्याची भाजी,वांग्याचे भरित,बाजरीची भाकरी,त्यावर लोण्याचा गोळा,मुगाची खिचडी....स्वर्गसुख ते हेच😊
खरंतर आयुर्वेदात वांगी ही वातूळ फळभाजी म्हणून जरा नाकारलीच जाते,वातविकार असणाऱ्यांना अपथ्यच.पण जीभेपुढे कोणाचे चाललंय का?....वांग्यात फायबर आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात.कँन्सरवर मात करण्याचीही क्षमता वांग्यात असते. तिखट मसालेदार भरल्या वांग्याच्या भाजीवर ताव मारणे हे लहानपणापासूनच आवडीचे.😊😋आता इकडे घरातही सगळ्यांना प्रियच!! सातारा कराडकडे कृष्णेकाठच्या शेतामधल्या वांग्यांना तर भलतीच सुंदर चव असते.शिजल्यावर सालही गराबरोबर मिळून जाते.हल्ली लग्नांमध्येही भरली वांगी भाजी बुफे काउंटरवर दिसायला लागलीये.पण पोळी पुरी बरोबर खायला जरा नकोच वाटते!चुलीवर केलेली वांग्याची भाजी आणि भाकरी हा फक्कड बेत जमवायचा तर कुठे खेड्यातच जायला हवं....पण कशाचाही अतिरेक वाईटच!म्हणूनच आपल्याकडे चातुर्मासात चार महिने शरिरावर वातवृत्तीचा प्रकोप होऊ नये याकरता आषाढ ते मार्गशीर्षापर्यंत वांगं खाणं निषिद्ध मानले जाते...नंतर ते खायचे ते थेट खंडोबाचं नवरात्र झाल्यावर,चंपाषष्ठीला.खंडोबालाही या वांग्याचे भरीत रोडग्याचा नैवेद्य प्रिय!
...आता बाराही महिने ही वांगी मिळतात,खाल्लीही जातात...आपल्या जीभेचे चोचले पुरवायला!! चला तर...आता पुराणातली वांगी पुराणात ठेवून आजच्या रेसिपीला सुरुवात करु.🙂😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
4 व्यक्तींंसाठी
  1. 1/2किलो छोटी वांगी
  2. 4कांदे बारीक चिरून
  3. 1वाटी कोथिंबीर बारीक चिरुन
  4. 1वाटी खोवलेला ओला नारळ
  5. 1वाटी शेंगदाण्याचे कूट
  6. 2टीस्पून मीठ
  7. 2टीस्पून गोडा मसाला
  8. 2टीस्पून तिखट
  9. 1/2वाटी चिरलेला गूळ
  10. 1चमचा धणेजीरे पूड
  11. 8-10लसूणपाकळ्या
  12. 1चमचा हळद
  13. 1/2वाटी गोडेतेल
  14. कांदे,कोथिंबीर, लसूणपाकळ्या हे सर्व चॉपरमधून बारीक करून घ्यायचे आहे
  15. 1/2वाटी तेलापैकी 2 टीस्पून तेल वांग्याच्या भाजीत भरण्यासाठी मसाला करताना घालायचे आहे

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    प्रथम सर्व वांगी स्वच्छ धुवून घ्यावीत.चिरताना देठ काढून टाकावेत व वांग्याला दोन उभ्या चिरा द्याव्यात व वांगी पाण्यातच थोडा वेळ राहू द्यावे.म्हणजे काळपट पाणी निघून जाईल.नंतर सर्व वांगी निथळू द्यावीत. व नंतर थोडी कोरडी होऊ द्यावीत.

  2. 2

    आता बारीक केलेल्या कांदा,लसूण, कोथिंबीरीत आपण तयारी करताना घेतलेले ओले खोबरे,दाण्याचा कूट,गूळ,2चमचे गोडेतेल,मीठ,हळद,तिखट व गोडा मसाला धणेजीरे पूड एकत्र करून तो चिरलेल्या वांग्यात भरुन घ्यावा. कढई तापत ठेवून वाटीतले उरलेले सगळे तेल फोडणीसाठी घ्यावे.नेहमीप्रमाणे फोडणी करुन मसाला भरलेली वांगी आता त्यात घालावीत.व अधूनमधून हलवत रहावे.उरलेला सगळा मसालाही भाजीत घालावा व भाजी मंद आचेवर परतत रहावी.7-8मि.झाकण घालून भाजी होऊ द्यावी.

  3. 3

    साधारण 20मिनिटात खमंग अशी भरल्या वांग्याची भाजी शिजून तयार होते.ओले खोबरे,दाण्याच्या कुटामुळे भाजीला छान तेल सुटते.त्यामुळे पाणी घातले नाही तरी चालते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
रोजी
Pune
सदा सर्वदा योग कुकपँडचा घडावा ।कुकपँड कारणी नवा पदार्थ माझा घडावा ।आवडीने पदार्था सुगरणीने तो करुनी पहावा ।मने जिंकण्या मार्ग पोटातून जावा ।।
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes