चवळीची भाजी (chavdichi bhaji recipe in marathi)

Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
Vashi

#लंच
साप्ताहिक रेसिपी मध्ये चवळी ची भाजी लंच साठी केली आहे.

चवळीची भाजी (chavdichi bhaji recipe in marathi)

#लंच
साप्ताहिक रेसिपी मध्ये चवळी ची भाजी लंच साठी केली आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
4 जणांसाठी
  1. 1 कपचवळी
  2. 1मोठा कांदा
  3. 1टोमॅटो
  4. 7-8लसूण पाकळ्या
  5. 1 टेबलस्पूनगरम मसाला
  6. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  7. 1 टेबलस्पूनगोडा मसाला
  8. 1/2 टेबलस्पूनहळद
  9. 1 टीस्पूनराई
  10. 1 टेबलस्पूनजीरे
  11. 2 टेबलस्पूनतेल
  12. 1/4 कपकोथिंबीर
  13. आवश्यक्तते नुसार मीठ
  14. अवशक्तते नुसार पाणी

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    चवळी निवडून स्वच्छ धुवून घ्यावी. कुकरमध्ये तीन शिट्या देऊन शिजवून घ्यावी.

  2. 2

    कांदा, टोमॅटो, कोथिंबीर चिरून घ्यावे. लसूण ठेचून घ्यावा.

  3. 3

    गॅसवर मध्यम आचेवर एका पॅन मध्ये तेल घालावे. तेल गरम झाल्यावर त्यात राई, जीरे, लसूण घालावे. ते तडतडल्यावर त्यात कांदा घालावा. कांदा गुलाबी झाल्यावर त्यात टोमॅटो घालून परतून घ्यावे.

  4. 4

    एका प्लेट मध्ये शिजवलेल्या चवळ्या कुस्करून ठेवाव्यात. टोमॅटो तेल सोडायला लागल्यावर त्यात शिजवलेली चवळी घालावी. ढवळून घ्यावे. त्यात कुस्करलेली चवळी, सर्व मसाले, मीठ घालून सर्व एकत्र ढवळून घ्यावे. त्यात आवश्यक तेव्हढे पाणी घालूनभाजी शिजवून घ्यावी. दहा मिनिटांनी चवळीची भाजी (उसळ)तयार. वरून कोथिंबीर व मिरची घालून भाजी सजवावी. भात, पोळी किंवा भाकरी बरोबर सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
रोजी
Vashi
मला पदार्थ बनवायला आणि खिलवायला आवडते.
पुढे वाचा

Similar Recipes