स्ट्रॉबेरी मॉकटेल...Virgin Strawberry Mojito (strawberry mocktail recipe in marathi)

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
Dadar..Mumbai

#GA4 #Week17 की वर्ड- Mocktail
उन्हाळ्याच्या काहिली मध्ये म्हणा किंवा अगदी बोचर्या थंडीतही थंडगार बर्फ, आपल्याला हवी असतील ती फळे आणि त्याबरोबर लिंबू ,पुदिना ,कोथिंबीर ,काकडी यासारखे थंड स्वभावाचे सखे सोयरे एकत्र आले की पाठोपाठ Chilled Soda पण धावत येतोच खूब जमेगा रंग म्हणत त्याच्या या मित्रांची साथसंगत द्यायला...😀 आणि मग यांच्या दोस्तीतून जन्माला येतात एकापेक्षा एक सरस असे.. alcohol नसून सुद्धा केवळ यांच्या दोस्तीची नशा चढवणारे Mockails, आपणही या Chill सवंगड्यांच्या संगतीत Chill होऊन कधी stressfree होतो हे आपल्याला देखील कळत नाही... मैत्री पण अशीच असते ना...जिच्या संगतीत आपण मनमुरादपणे ,हवे तसे जगतो,मैत्रीला वय नसतेच,आपण कधीच मोठे होत नसतो मैत्रीमध्ये..ना कुणाचे बंधन असते..मैत्री आपला श्वास असते..आपला ऑक्सिजनच..म्हणून नुसत्या मैत्रीच्या आठवणीनेच लय भारी वाटतं ना..आणि जेव्हां प्रत्यक्ष भेटतो तेव्हां तर विचारुच नका.मन उधाण वार्याचं होतं..आणि मग ये दोस्ती हम नही छोडेंगे म्हणत आपण परत refresh होतो.तुकाराम महाराजांनी पण म्हटले आहे..." माझिया कुळीचा मज भेटो कुणी.." ..तर अशी ही दोस्तीची नशा ..चला तर आज आपण स्ट्रॉबेरी आणि त्याच्या सवंगड्यांच्या दोस्तीचा नशा अनुभवूया..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनीटे
2 जणांना
  1. 1 कपताजी स्ट्रॉबेरी
  2. 10-12पुदिन्याची पाने
  3. 1 कपचुरा केलेला बर्फ
  4. 3-4 टेबलस्पून साखर आवडीनुसार
  5. 1 टीस्पूनलिंबाचा रस
  6. 5-6 तुकडेलिंबाचे
  7. तुकडेस्ट्रॉबेरी चे
  8. 1.5-2 कप सोडा

कुकिंग सूचना

15 मिनीटे
  1. 1

    प्रथम स्ट्रॉबेरी,तीन-चार पुदिना पाने आणि साखर एकत्र करून मिक्सरमधून फिरवून घ्यावे. अर्ध्या लिंबाचा रस काढावा.

  2. 2

    आता एका ग्लासमध्ये किंवा बॉटलमध्ये तळाला-3-4लिंबाचे तुकडे, पुदिन्याची पाने घालून थोडे क्रश करून घ्यावे नंतर त्यात बर्फाचा चुरा घाला.

  3. 3

    आता यावर मिक्सर मधून बारीक केलेला स्ट्रॉबेरी पल्प घालावा. लिंबाचा रस घाला. स्ट्रॉबेरीचे,लिंबाचे 2-3तुकडे घाला. थोडी पुदिन्याची पाने घाला. व्यवस्थित ढवळा आणि वरून हवा तेवढा सोडा घाला. तयार झाला आपला स्ट्रॉबेरी मोईतो..

  4. 4

    सर्व्ह करताना वरून दोन-तीन स्ट्रॉबेरी तुकडे, एखादे पुदिन्याचे पान त्याचप्रमाणे ग्लास वर एक लिंबाची चकती, स्ट्रॉबेरी लावून डेकोरेट करा. त्यात स्ट्राँ घालून सर्व्ह करा..

  5. 5
  6. 6
  7. 7
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
रोजी
Dadar..Mumbai
trying new recipes n food photography both are kind of stress buster to me...Write ups,poems, reading, travelling ...my inner peace...😇
पुढे वाचा

Similar Recipes