भोगीची भाजी (bogichi bhaji recipe in marathi)

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

#cooksnap
#मकर
वंदना शेलार ह्यांनी बनवलेली भोगी ची भाजी केली. खुपचं छान झाली. धन्यवाद.

भोगीची भाजी (bogichi bhaji recipe in marathi)

#cooksnap
#मकर
वंदना शेलार ह्यांनी बनवलेली भोगी ची भाजी केली. खुपचं छान झाली. धन्यवाद.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मीनीट
  1. 3-4वालाच्या शेंगा
  2. 1 टेबलस्पूनगाजराचे पीसेस
  3. 1वांग्याचे काप
  4. 1 टेबलस्पूनमटार
  5. 1कांदाा
  6. 1टमाटाा
  7. 3-4बोर
  8. 1 टेबलस्पूनशेंगदाणे
  9. 1 लहानबटाटा
  10. 2 टेबलस्पूनकोथिंबीर
  11. १+१/२ टेबलस्पून खोबऱ्याचा कीस
  12. 3हिरव्या मिरच्या
  13. 1 इंचआलं
  14. 7-8लसूण पाकळ्या
  15. 1 टीस्पूनतिखट
  16. 1 टीस्पूनगरम मसाला
  17. 1/4 टीस्पूनहिंग
  18. 1/4 टीस्पूनहळद
  19. 1 टीस्पूनतिळ
  20. 1 टीस्पूनजीरे
  21. 2 टेबलस्पूनतेल
  22. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

३० मीनीट
  1. 1

    प्रथम खोबरं, आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर यांचं मिक्सरवर वाटण करून घेतलं. सर्व भाज्या व कोथिंबीर बारीक चिरून घेतली.

  2. 2

    गॅसवर कढईमध्ये तेल गरम करून त्यात तीळ, जिरं, हिंग व कांदा घालून परतून घेतले. मग त्यात टमाटा घालून मऊ होईपर्यंत परतून घेतले. नंतर तिखट, गरम मसाला, हळद वरील वाटण घालून परतले.

  3. 3

    आता त्यात बटाटा, वांग, गाजर, वाल, मटार, बोर या सर्व भाज्या घालून परतून एक वाफ आणली. मग त्यात थोडे पाणी व मीठ आणि थोडा गूळ घालून पाच-सात मिनिटे चांगले शिजवून घेतले.

  4. 4

    वरील भाजी डीशमधे मध्ये काढून पोळीबरोबर सर्व्ह केली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
रोजी
Nashik, Maharashtra

टिप्पण्या

Similar Recipes