लाटी वडी (lati vadi recipe in marathi)

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995

ही वडी खमंग व चटकदार लागते.करायला पण सोप्पी आहे.
मकरसंक्रांतीच्या सणाला नवीन लग्न झालेली वधू म्हणजे पहिलाच मकरसंक्रांतीचा सण असेल तर तिला बुत्ती मध्ये सजोरी व लाटी वडी देतात.हे दोन्ही पदार्थ महत्त्वाचे आहेत.

लाटी वडी (lati vadi recipe in marathi)

ही वडी खमंग व चटकदार लागते.करायला पण सोप्पी आहे.
मकरसंक्रांतीच्या सणाला नवीन लग्न झालेली वधू म्हणजे पहिलाच मकरसंक्रांतीचा सण असेल तर तिला बुत्ती मध्ये सजोरी व लाटी वडी देतात.हे दोन्ही पदार्थ महत्त्वाचे आहेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40-50 मिनिटे
20-25 वड्या
  1. 1 कपबेसन पीठ
  2. 1/4 कपगव्हाचे पीठ
  3. 1 टीस्पूनलाल तिखट
  4. चवीप्रमाणे मीठ
  5. 1/2 कपखोबरे किस
  6. 1/4 कपचिरलेली कोथिंबीर
  7. 1 टेबलस्पूनखसखस
  8. 1 टेबलस्पूनतीळ
  9. 7-8लसूण पाकळ्या
  10. 1/4 कपकारळ्याची चटणी
  11. 1 टीस्पूनलाल तिखट
  12. चवीप्रमाणे मीठ
  13. थोडेसे तेल
  14. थोडेसे पाणी

कुकिंग सूचना

40-50 मिनिटे
  1. 1

    एकाबाऊल मध्ये बेसन पीठ,गव्हाचे पीठ,लाल तिखट,मीठ घालून चांगले मिक्स करून घेणे व थोडे थोडे पाणी घालून मध्यम घट्ट भिजवून घेणे. तेलाचा हात लावून झाकून बाजूला ठेवून द्यावे.

  2. 2

    एका ताटलीत कारळ्याची चटणी किंवा नुसते कारळे घ्यावे. खोबरेकिस, तीळ,खसखस,लाल तिखट,मीठ,चिरलेली कोथिंबीर,लसूण पाकळ्या घेणे. यापैकी खोबरे किस, तीळ, खसखस पॅनमध्ये थोडेसे गरम करून घेणे.एकत्र मिक्स करून घेणे. चटणी ऐवजी कारळे घेतले तर सर्व मिक्सरमधुन मध्यम जाडसर वाटून घेणे. तिखट कमी-जास्त करू शकता.

  3. 3

    गॅसवर स्टिमरच्या भांड्यामध्ये पाणी घालून तापत ठेवावे. पीठ मळून घेणे. त्याचे सारखे तीन गोळे करून घ्यावे व एका गोळयाची जाडसर पोळी लाटून घ्यावी. सारणाचे तीन भाग करून घेणे. एक भाग मिश्रण पोळीवर पसरवून घेणे.

  4. 4

    त्या पोळीचा रोल करून घेणे. दोन्ही हातांनी अलगद दाबून त्रिकोणी आकार देऊन घेणे. सुरीने त्याचे तिरपे तुकडे करून घेणे.

  5. 5

    स्टिमरच्या ताटलीला तेल लावून घेणे. त्यात तयार वडया ठेवून ती ताटली स्टिमर मध्ये ठेवून झाकण लावून घेणे. अशाप्रकारे सर्व वडया करून घेणे.

  6. 6

    10 मिनिटे वाफवून घेणे. थंड झाल्यावर पॅनमध्ये तेल टाकून वड्या परतवून घेणे. हया वड्या 7-8 दिवस टिकतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes