"मुगाची रसभरीत भाजी" (moongachi rasbharit bhaji recipe in marathi)

लता धानापुने
लता धानापुने @lata22

#डिनर
#बुधवार
#डिनर मधील पहिली रेसिपी

"मुगाची रसभरीत भाजी"
सुकी नाही आणि ओलीही नाही (आमच्या कडे लगथबीत असे म्हणतात,गावाकडचा शब्द) अशी ही भाजी होते...
मोड आलेले मूग माझ्याकडे नेहमीच असतात..मी जास्त च भिजवून मोड आणून ठेवते.. चार पाच वेळा तरी नाष्टा,उसळ,सुक्की भाजी बनवली जाते..

"मुगाची रसभरीत भाजी" (moongachi rasbharit bhaji recipe in marathi)

#डिनर
#बुधवार
#डिनर मधील पहिली रेसिपी

"मुगाची रसभरीत भाजी"
सुकी नाही आणि ओलीही नाही (आमच्या कडे लगथबीत असे म्हणतात,गावाकडचा शब्द) अशी ही भाजी होते...
मोड आलेले मूग माझ्याकडे नेहमीच असतात..मी जास्त च भिजवून मोड आणून ठेवते.. चार पाच वेळा तरी नाष्टा,उसळ,सुक्की भाजी बनवली जाते..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

वीस मिनिटे
दोन
  1. 1 कपमोड आलेले मूग
  2. 1कांदा बारीक कापून
  3. 1टाॅमेटो बारीक कापून
  4. आवडीनुसार कोथिंबीर
  5. 1 टीस्पूनलाल तिखट
  6. 1/2 टीस्पूनपावभाजी मसाला
  7. 1/4 टीस्पूनहळद
  8. 1/4 टीस्पूनहिंग
  9. 1/2 टीस्पूनघरचा मसाला
  10. चवीनुसारमीठ
  11. 1/4 कपओलं खोबरं
  12. 4पाच लसणाच्या पाकळ्या
  13. 5सहा कडिपत्ता पाने
  14. 1 टीस्पूनधने पूड

कुकिंग सूचना

वीस मिनिटे
  1. 1

    मूग सहा सात तास भिजत घालावे व नंतर दोन पाण्याने धुऊन चाळणीमध्ये उपसुन घ्यावे.. पाणी निथळून, झाकण ठेवून मोड येण्यासाठी रात्रभर ठेवावे..

  2. 2

    एक कप मूग आणि दिड कप पाणी घालून मिडीयम गॅसवर शिजू द्यावे...

  3. 3

    कांदा टाॅमेटो कोथिंबीर बारीक कापून घ्यावी.. खोबऱ्याचे काप करून घ्यावेत व मिक्सरमधून लसूण, खोबरे पाणी न वापरता बारीक वाटून घ्यावे.

  4. 4

    मुग उकडले की दुसऱ्या बाऊलमधे काढून घ्यावे त्यातील पाणी फेकु नये,त्यातच राहू द्यावे..

  5. 5

    त्याच कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जीरे, हिंग, हळद, कांदा, टाॅमेटो, कडिपत्ता, कोथिंबीर घालून परतून घ्यावे... नंतर सगळे मसाले घालावे..

  6. 6

    सगळे मसाले घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे..शिजवलेले मुग त्यातील पाण्यासकट घालावे व मीठ घालून चांगले मिक्स करावे..

  7. 7

    बारीक गॅसवर पाच सहा मिनिटे शिजू द्यावे... थोडीशी ओलसर भाजी असेल तेव्हा गॅस बंद करावा..

  8. 8

    तय्यार झालेली रसभरीत भाजी चपाती भाकरी भातासोबत सर्व्ह करावी..

  9. 9

    गरमागरम भाकरी सोबत सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
लता धानापुने
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes