"घरचे साजूक तूप" (gharche shajuk toop recipe in marathi)

लता धानापुने
लता धानापुने @lata22

#साजूक तूप म्हटलं की साय फेटायची रवि ,गाडगे, मडके,आजी तासभर साय फेटताना... लोण्याचा गोळा,मग ते साजुक तूप खाण्याची मजा, असे बरंच काही लहानपणी बघीतलेले, अनुभवलेले सगळे आठवते..मी पण हाय जमा करून त्याचे साजुक तूप बनवते,पण..
सोप्या पद्धतीने.. आता एवढ्या सुखसुविधा आहेत,मग हातांना जास्त त्रास कशाला नाही का..
आपला मिक्सर आहेच की, आपल्या मदतीसाठी.. कोणतही वाटण असो, नाहीतर साजुक तूप असो,मिक्सर आपल्या सेवेसाठी तत्पर असतो,असेच म्हणावे लागेल..तर मी मिक्सरमध्ये पंधरा दिवसांच्या साय चे साजुक तूप कसे बनवले चला तुम्हाला ही दाखवते..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

अर्धा तास
चार जण, महिनाभरासाठी
  1. 15 लिटरदुधावरची साय
  2. 2 लिटरथंड पाणी
  3. 1खायच पान

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    दररोज मंद गॅसवर दुध तापवुन थंड झाले की फ्रिजमध्ये ठेवावे.. मस्त भाकरी सारखी मोठी आणि घट्ट साय येते..ती दररोज काढून घ्यावी व हवाबंद डब्यात भरून फ्रिजर मध्ये ठेवावी.. ही साय मी फ्रिजरमधुन काढून मोठ्या बाऊलमधे सकाळीच ठेवली होती..फ्रिजरमधुन काढली तेव्हा खुप घट्ट बर्फासारखी होती.. दोन तासात ती रुमटेंपरेचर वर येते..

  2. 2

    शंभर ग्रॅम दही मिक्स करून फ्रिजमध्ये ठेवावे.. चार पाच तासांनी काढून घ्यावे

  3. 3

    मिक्सर चे ज्युस बनवायचे जार घेऊन त्यात प्रत्येक वेळी चार पळी भरून साय टाकावी आणि एक मिनीटभर मिक्सर चालू बंद करत फिरवून घ्यावी..

  4. 4

    एक मिनिटात लोणी वर यायला सुरुवात होते..मग परत एक दोनदा फिरवून घ्यावे.. मस्त लोण्याचा गोळा तयार होतो व त्यातील दुध वेगळे होते..

  5. 5

    या पद्धतीने सगळी साय मिक्सरमध्ये फिरवून घ्यावी..व लोणी पातेल्यात काढून घ्यावे

  6. 6

    लोण्याच्या पातेल्यात थंड पाणी टाकून ते धुवून घ्यावे..असे तीन चार वेळा करावे मग चांगले लोणी तयार होऊन तुप जास्त निघते व बेरी कमी निघते..

  7. 7

    तीन चार वेळा थंड पाणी घालून धुतले की असे छान लोणी तयार होते.. तयार लोणी मोठ्या पातेल्यात काढून घ्यावे..

  8. 8

    गॅस मंद आचेवर करून पातेले ठेवावे लगेचच लोणी वितळायला सुरुवात होते..व अर्ध्या तासात साजूक तूप तयार होते..

  9. 9

    वर आलेला मावा (बेरी) काढून ठेवावा..गोडाचा पदार्थ बनवताना त्यात टाकावे.. किंवा साखर घालून गरम करून कलाकंद ही छान होतो त्याचा..

  10. 10

    तुप लवकरच तयार होणार त्या स्टेपला त्यात एक खाऊच पान टाकावे..त्याने तुपाला सुगंध छान येतो आणि भरपूर दिवस टिकते....

  11. 11

    तयार झालेले साजुक तूप थंड झाल्यावर गाळणीने गाळून मगच एका पॅकबंद बरणी मध्ये ओतुन ठेवावे... किंवा लगेच गोडाचे पदार्थ बनविण्यास सुरुवात करावी... पंधरा दिवसांच्या साय मध्ये एक किलो किंवा थोडेसे च कमी एवढ गावठी साजुक तूप तयार होते..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
लता धानापुने
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes