घरचे साजूक तूप(Sajuk Tup Recipe In Marathi)

Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103

#UVR
दत्त दत्त दत्ताची गाय, गायीचे दूध, दूधाची साय, सायीचे दही, दह्याचे ताक, ताकाचे लोणी, लोण्याचे तूप, तूपाची वात, देवापुढे जळो सारी रात. तर असे हे लोण्याचे साजुक तूप आ हा हा,नुसता घमघमाट. साजूक तूप उपवासाचे पदार्थ तसेच रोजच्या जेवणात ही वापरून जेवणाची लज्जत वाढते. गोडे वरण, भातावर साजुक तुपाची धार आ हा हा....

घरचे साजूक तूप(Sajuk Tup Recipe In Marathi)

#UVR
दत्त दत्त दत्ताची गाय, गायीचे दूध, दूधाची साय, सायीचे दही, दह्याचे ताक, ताकाचे लोणी, लोण्याचे तूप, तूपाची वात, देवापुढे जळो सारी रात. तर असे हे लोण्याचे साजुक तूप आ हा हा,नुसता घमघमाट. साजूक तूप उपवासाचे पदार्थ तसेच रोजच्या जेवणात ही वापरून जेवणाची लज्जत वाढते. गोडे वरण, भातावर साजुक तुपाची धार आ हा हा....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 3 कपदुधावरची साय
  2. 1 टे. स्पून दही
  3. 1 चिमुटभरमीठ

कुकिंग सूचना

  1. 1

    मी 10 दिवसाची दूधाची साय साठवली ती अशी - एका भांड्यात पहिल्या दिवशीच्या सायीत दही घालून चांगले मिक्स करून रात्रभर साधारण तापमानात बाहेर ठेवले, नंतर दुसऱ्या दिवसाची साय घालून मिक्स करुन ते भांडे फ्रिज मधे ठेवले,असेच पुढिल 2 दिवसाची साय त्यात घालून फ्रिज मधे ठेवले. नंतर हे सायीचे भांडे 5-6 तास फ्रिज मधून काढून साधारण तापमानात विरजण लागण्याची साठी ठेवले. अशा प्रकारे साय घातल्यावर दोन दिवसाची साय घालून फ्रिज मधे तर एक दिवस बाहेर ठेवून विरजण लावावे.

  2. 2

    आता हे विरजण लागलेले सायीचे दही एका भांड्यात काढून चांगले घुसळून घ्यावे. नंतर त्यात आवश्यक तेवढे पाणी घालून चांगले घुसळावे जोपर्यंत लोणी जमा होत नाही तोपर्यंत घुसळावे. (थंडी असते तेंव्हा गरम पाणी व उन्हाळ्यात थंड पाणी वापरावे. त्यामुळे लोणी जादा निघते) लोणी व ताक वेगवेगळे करावे. ताकाचा वापर कढी, उकड, मठ्ठा करावा.

  3. 3

    आता निघालेले लोणी चांगल्या पाण्यातून धुवून काढावे.(आंबटपणा असेल तर जातो) आता एका भांड्यात लोणी घालून गॅसवर कढवण्यास ठेवणे.

  4. 4

    तूप चांगले खरपूस होई पर्यंत कढवावे.

  5. 5

    साजूक तूप साफ बरणीत भरून हवे तेंव्हा वापरावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Arya Paradkar
Arya Paradkar @The_Food_Swings_1103
रोजी
follow me on instagramhttps://www.instagram.com/invites/contact/?i=1sooz9w80xnvo&utm_content=fkll408To follow my recipe photos and videoshttps://youtube.com/@aryaparadkar7350?feature=sharedplease like share comment and subscribe to my channel🙏 🌹
पुढे वाचा

Similar Recipes