परवर भाजी (parwar bhaji recipe in marathi)

Hema Wane
Hema Wane @hemawane_5557

#GA4 #week26 #मी point gourd हा शब्द घेऊन रेसिपी केली आहे.परवर ही भाजी आपल्या शरीरासाठी अत्यंत बहुगुणी आहे.ह्या मधे अनेक vitamins आहेत जसे अ ,ब, ब1,ब2 शिवाय आयर्न,कॅल्शियम,फॉस्फरस पण आहे असा हा बहुगुणी परवर मधुमेही लोकांनी आठवड्यात 2/3 वेळा तरी खावा. वजन कमी करण्यासाठी ह्याचा रस प्यावा .चला तर अश्या परवर ची भाजी बघुया कशी करायची .

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मि
2 सर्व्हिंग्ज
  1. 250 ग्रॅमपरवर
  2. 1/2 कपकांदा
  3. 1/4 कपटोमॅटो
  4. 1/2 टीस्पूनमोहरी
  5. 1/2 टीस्पूनजीरे
  6. 1/4 टीस्पूनहिंग
  7. 3-4कढीपत्ता
  8. 1 टीस्पूनलाल तिखट
  9. 1 टीस्पूनगोडा मसाला
  10. 1/2 टीस्पूनहळद
  11. 1 टेबलस्पूनशेंगदाणे कूट
  12. 2 टेबलस्पूनओले खोबरे
  13. 1 टेबलस्पूनकोथिंबीर
  14. 2 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

30 मि
  1. 1

    परवर स्वच्छ धुवून त्याची साले काढावीत व खालील प्रमाणे चिरावी व कांदा, टोमॅटो ही चिरून घ्या. खालील प्रमाणे तयारी करावी.

  2. 2

    आता एका कढईत तेल टाका तापले कि त्यात मोहरी घाला तडतडली कि जीरे घाला, हिंग व कढीपत्ता घाला नि नंतर कांदा घाला नि परता.आता टोमॅटो घाला मऊ शिजला कि हळद, तिखट, गोडा मसाला, मीठ घाला, शेंगदाणे कूट घाला नि 1मिनिटे परता.

  3. 3

    आता चिरलेला परवर घाला नि छान परता झाकणावर पाणी ठेऊन भाजी शिजवून घ्या. साधारण 10मिनिटांत शिजेल.भाजी शिजली कि ओला नारळ नि कोथिंबीर घाला.

  4. 4

    परवर ची बहूगुणी भाजी तयार आहे चपाती,भाकरी बरोबर छान लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Hema Wane
Hema Wane @hemawane_5557
रोजी

Similar Recipes