ओली भेळ (oli bhel recipe in marathi)

Hema Wane
Hema Wane @hemawane_5557

#GA4 #week26 #भेळ हा शब्द घेऊन रेसिपी केली आहे.सगळ्यांना आवडणारी मला वाटत भारतभर स्ट्रीट फुड म्हणून प्रसिद्ध असेल नि मुंबई ला तर कुठेही मिळणारी मला तर लोकल मधे मिळणारी पण आठवते पण फार पुर्वी म्हणजे 20 वर्षा पुर्वी मिळायची .

ओली भेळ (oli bhel recipe in marathi)

#GA4 #week26 #भेळ हा शब्द घेऊन रेसिपी केली आहे.सगळ्यांना आवडणारी मला वाटत भारतभर स्ट्रीट फुड म्हणून प्रसिद्ध असेल नि मुंबई ला तर कुठेही मिळणारी मला तर लोकल मधे मिळणारी पण आठवते पण फार पुर्वी म्हणजे 20 वर्षा पुर्वी मिळायची .

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनीटे
2/3 सर्व्हिंग्ज
  1. 3 कपकुरमुरे
  2. 1 कपफरसाण
  3. 1/2 कपचणे शेंगदाणे
  4. 1/2 कपबारीक शेव
  5. 1 कपकांदा चिरलेला
  6. 1/2 कपटोमॅटो चिरलेला
  7. 1/2 कपबटाटा
  8. 1/4 कपकोथिंबीर
  9. 2/3हिरव्या मिरच्या चिरलेल्या
  10. 1लिंबू
  11. हिरवी चटणी(पुदिना,कोथिंबीर,मिरची,मीठ,आल,जीरे )
  12. आंबट गोड चटणी(खजूर,चिंच,गुळ,लाल तिखट, जीरे )
  13. 1 टीस्पूनमीठ
  14. 1 टीस्पूनलाल तिखट

कुकिंग सूचना

15 मिनीटे
  1. 1

    कोथिंबीर,कांदा,टोमॅटो,मिरची चिरून घेणे.बटाटा उकडून घेणे.

  2. 2

    चटण्या नसतील करणे.हिरवी चटणी..(2टेबलस्पून पुदिना,2टेबलस्पूनकोथिंबीर,1मिरची,1/2जीरे,
    आल,मीठ,)
    आंबट गोड चटणी..(4/5 खजूर, 1टेबलस्पून चिंचेचा कोळ,1टेबलस्पून गुळ, लाल तिखट, 1/2जीरेपुड)

  3. 3

    भेळेचे जिन्नस एकत्र करावे.

  4. 4

    भेळेचे सर्व जिन्नस एकत्र करून त्यात आवडीप्रमाणे चटण्या,कांदा, टोमॅटो, मीठ, तिखट,कोथिंबीर,मिरची टाका नि मिसळून घ्या.वरून बालीक शेव कोथिंबीर टाका.मस्त झणझणीत चटकदार भेळ तयार आहे.चटकन खा नाहीतर मऊ होईल.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Hema Wane
Hema Wane @hemawane_5557
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes