ओली भेळ (oli bhel recipe in marathi)

Komal Jayadeep Save
Komal Jayadeep Save @Komal_Jayadeep

ओली भेळ (oli bhel recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 2मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे
  2. 1कांदा
  3. 1टोमॅटो
  4. 2 टेबलस्पूनकोथिंबीर
  5. 1/2 कपतळलेले डाळे
  6. 1/2 कपप्लेन आलू भुजिया
  7. 100 ग्रॅमकुरमुरे
  8. 1 टेबलस्पूनचाट मसाला
  9. चवीनुसारकाळ मीठ
  10. 1/2 कपगोड लाल चटणी
  11. 1/2 कपहिरवी तिखट चटणी

कुकिंग सूचना

  1. 1

    कांदा, टोमॅटो, कोथिंबीर व्यवस्थित बारीक चिरून घ्या... मग त्यामध्ये उकडलेला बटाटा कुस्करून किंवा किसून घाला... मी हिरवी चटणी वापरणार आहे, त्यामुळे हिरवी मिरची घातली नाहीये... तुम्हाला आवडत असल्यास बारीक चिरून हिरवी मिरची घालावी...

  2. 2

    मग त्यामध्ये शेव आणि डाळी घालावे... ओल्या भेळीसाठी मी नेहमी शेव ऐवजी आलू भुजिया घालते... शेव पटकन नरम पडते... त्या प्रमाणात आलू भुजिया बऱ्यापैकी कुरकुरीत राहतात... तरीही आपल्या आवडीनुसार...

  3. 3

    मग त्यामध्ये कुरमुरे चाट मसाला आणि काळा मीठ घालावे... चाट मसाला थोडासा सॉल्टी असतो त्याचा अंदाज घेऊन मीठ घालावे... काळे मीठ नसल्यास साधा मीठ घाला पण काळमीठ जास्त छान लागत... सर्व छान व्यवस्थित मिक्स करून घ्या...

  4. 4

    मग त्यामध्ये हिरवी आणि लाल चटणी घाला... आवडत असल्यास लसणाची चटणी सुद्धा घालू शकता... सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्या...

  5. 5

    आपली छान चटपटीत ओली भेळ तयार आहे...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Komal Jayadeep Save
Komal Jayadeep Save @Komal_Jayadeep
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes