मुरमुर्याची ओली भेळ.. (murmuryachi oli bhel recipe in marathi)

Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg

#GA4
#week26
#Bhel
भारतामध्ये भेळ हा सर्वात जास्त प्रसिद्ध स्ट्रीट फुड म्हणून ओळखला जातो. नानाविध फरसाण, चटण्या यांनी बनलेली चटपटीत, आंबट-गोड परंतु मनाला आनंद देणारी ही भेळ...
भेळेला फक्त स्वाद सामावून घ्यायचा असतो स्वतःमध्ये... अगदी आजूबाजूंच्या लोकांसारखे... आजूबाजूला कितीतरी जाती धर्माचे लोक एकत्र राहतात.. त्यांच्या संस्कृती वेगळ्या.. पण तरीही एकमेकांसोबत गुण्यागोविंदाने राहतात शेजारधर्म म्हणून...
मला आठवत मी जे. बी. सायन्स कॉलेज ला असताना, आमच्या तिथे मराठी चे नवनीत देशमुख म्हणून प्राध्यापक होते.. खूप सुंदर अप्रतिम लिखाण करायचे.. क्लासमध्ये जर कुणी आगाऊ पोरं पोरींनी क्लास चुकवला तर आमचे मराठीचे सर आपल्या मिश्कील भाषेमध्ये, लटक्या रागाने मजेत म्हणायचे... गेली वाटतं ही, मुलं-मुली..भटकायला...आणि त्यांचे नंतरचे वाक्य असायचे.. "आम्ही दोघे बहिण-भाऊ, कॅन्टीन वर जाऊन भेळ खाऊ.. हे ऐकून क्लास फिदीफिदी हसत राहायचा.... 😀😀 असो..... 25 वर्षानंतर जुन्या आठवणींना भेळच्या निमित्ताने का होईना उजाळा मिळाला...
चला तर मग आपणही जिभेला आंबटगोड अशी मेजवानी देऊया या ओल्या मुरमुर्याच्भेया भेळने... 💃 💕

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिटे
चार व्यक्ती साठी
  1. 2 कपमुरमुरे
  2. 1 कपमक्काचे पोह
  3. 5-6हिरव्या मिरच्याचे वाटण (पेस्ट करू नका, ओबडधोबडच ठेवा)
  4. 1/4 कपचिंच गुळाची पातळ चटणी
  5. 1मोठा टोमॅटो बारीक चिरलेला
  6. 1मोठा कांदा बारीक चिरलेला
  7. 1/2 कपकोथिंबीर चिरलेली
  8. 5-6कढीपत्त्याची पाने
  9. 1कच्चा आंबा बारीक चिरलेला
  10. 1/2 कपबारीक शेव
  11. 6-7खरमुरे तळलेले
  12. 3-4 टेबलस्पूनशेंगदाणे
  13. 3-4 टेबलस्पूनडाळ
  14. मीठ चवीनुसार
  15. 4-5 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

10 मिनिटे
  1. 1

    भेळ करण्यासाठी लागणारे सर्व साहित्य तयार ठेवावे. मुरमुरे चाळणीने चाळून घ्यावे. टोमॅटो, कांदा,कच्ची कैरी, कोथिंबीर बारीक चिरून घ्यावीत. हिरव्या मिरचीचे वाटण तयार करून ठेवावे.

  2. 2

    शेंगदाणे,डाळ, कढीपत्ता, खरमुरे, मक्याचे पोहे तळून घ्यावे. व हे तळलेले सर्व जिन्नस मुरमुर्यावरती घालावे. चांगले मिक्स करून घ्यावे. नंतर त्यामध्ये तिखट, मीठ, हळद घालून चांगले परत मिक्स करून भंडग (कच्चा चिवडा) तयार करून घ्यावे.

  3. 3

    आता जेवढी
    भेळ बनवायची आहे, तेवढाच चिवडा मिक्सिंग वाटी मध्ये घेऊन, त्यामध्ये चिरलेला टोमॅटो, कांदा, हिरव्या मिरचीचे वाटण, कच्ची कैरीचे काप व चिंचेची चटणी, कोथिंबीर घालून चांगले मिक्स करून घ्यावे.

  4. 4

    तयार ओल्या भेळवरती वरून शेव, कांदा, टोमॅटो घालावा. व सर्व्ह करावी... *मुरमुर्याची ओली भेळ*... 💃 💕

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes