मिसळ पाव (misal paav recipe in marathi)

Ashwini Jadhav
Ashwini Jadhav @cook_24351128
Pune

#रेसिपीबुक #week2 #रेसिपी_2 गावाकडची आठवण
मी मूळची कोल्हापूरची... कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा तर सर्वांना माहित असेलच... त्याची पोस्ट पुन्हा कधीतरी करेनच... आता मी घेऊन आलेय कोल्हापूरची आणखी एक खिसियत... ती म्हणजे कोल्हापूरी मिसळ... 😍😍😋😋
खरतर आमच्याकडे मिसळ सोबत पेटीपाव खातात पण तो इथे पुण्यात नाही मिळत म्हणून आम्ही ब्रेड सोबत खातो... पण आज आमच्या अहोंनी ब्रेडच्या एवजी लादी पाव आणला... 🙄🙄 म्हटलं आता असू दे आणला तर आणला... त्यामुळे आज तर कोल्हापुर पुणे फ्यूजन झाले म्हणायचे... कोल्हापूरी मसाल्यातली पुणेरी इस्टाईल मिसळ... 🤣🤣 चला तर मग बघुया रेसिपी... 👍🏻😁

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
3 व्यक्तींसाठी
  1. 1बाऊल मोड आलेली मटकी
  2. 1 वाटीवाटण (कांदा, टोमॅटो, आले, लसूण, सुके खोबरे, कोथिंबीर, तीळ आणि जीरे)
  3. 3 टीस्पून कोल्हापूरी कांदा लसूण मसाला
  4. 1 टीस्पून बेडगी मिर्ची पावडर
  5. 1 टीस्पूनहळद
  6. 2 टीस्पूनगरम मसाला
  7. 1 टीस्पूनधणे जीरे पावडर प्रत्येकी
  8. चवीनुसारमीठ
  9. 2पळी तेल

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    सर्वात आधी स्प्राऊट्स थोडे तेल टाकून भाजायचे आणि त्यात थोडे मीठ, हळद आणि पाणी (आपल्याला किती प्रमाणात सॅम्पल हवे तेवढे) घालून शिजवून घ्यायचे. शिजल्यावर स्प्राऊट्स स्टाॅकमधून गाळून बाजूला काढून ठेवायचे.

  2. 2

    आता कांदा, टोमॅटो, आले, लसूण, सुके खोबरे, तीळ आणि जीरे थोडे तेल टाकून भाजायचे आणि मिक्सरमधून वाटून घ्यायचे.

  3. 3

    आता एका पातेल्यात तेल गरम करून त्यात वाटण आणि कोल्हापूरी लाल तिखट, बेडगी मिर्ची पावडर घालून मसाला भाजायचा. मसाला भाजत असतानाच त्यात गरम मसाला, धणे जीरे पावडर घालायची. कहेने तेल सुटू लागले की मसाला भाजला असे समजायचे. आता त्यात मोड शिजवलेले पाणी आमि आवश्यक असल्यास मीठ घालून ऊकळी काढायची.

  4. 4

    सर्व्ह करताना फोटोत दाखवल्याप्रमाणे सर्व्ह करा. खाली दिलेला दूसरा फोटो कोल्हापूरी पद्धतीचा आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ashwini Jadhav
Ashwini Jadhav @cook_24351128
रोजी
Pune

टिप्पण्या

Similar Recipes