टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)

Rupali Atre - deshpande
Rupali Atre - deshpande @Rupali_1781

#hs
#सूप प्लॅनर
#टोमॅटो सूप

टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)

#hs
#सूप प्लॅनर
#टोमॅटो सूप

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25-30 मिनिटे
3 सर्व्हिंग्ज
  1. 5-6लाल टोमॅटो
  2. 1कांदा
  3. 5-6लसूण पाकळ्या
  4. 3-4छोटे तुकडे आले
  5. 1 टेबलस्पूनसाखर
  6. चवीनुसारमीठ
  7. 1/2 टीस्पूनलाल तिखट (ऑपशनल)
  8. 6-7काळी मिरी
  9. 1तमालपत्र
  10. 1 टीस्पूनजीरे
  11. 1 टीस्पूनबटर / तेल
  12. 1 टेबलस्पूनबीट
  13. आवश्यकतेनुसार पाणी
  14. 2ब्रेड स्लाईस
  15. 1 टेबलस्पूनकॉर्नफ्लॉवर

कुकिंग सूचना

25-30 मिनिटे
  1. 1

    प्रथम लाल टोमॅटो स्वच्छ धून बारीक चिरून घेणे कांदा, बीट बारीक चिरून घेणे.

  2. 2

    आता गॅस वर कढई ठेवून त्या मध्ये थोडे तेल घालावे. तेल तापले कि जीरे, तमालपत्र घालावे. आता या मध्ये बारीक चिरलेला कांदा, लसूण, आले घालून मिनिट मऊ होईपर्यंत परतून घेणे.आता या मध्ये टोमॅटो, बीट, काळी मिरी घालून 5-6 मिनिट छान परतून घेणे.

  3. 3

    आता या मध्ये 2 कप पाणी घालावे. टोमॅटो 10 मिनिटे छान एकजीव शिजवून घेणे. थंड होऊ देणे.

  4. 4

    आता हे सगळे मिश्रण मिक्सर मधून बारीक करून घेणे. व गाळणीने गाळून घेणे.

  5. 5

    आता हे सगळे सूप एका पातेले मध्ये काढून घेणे. व गॅस वर उकलण्यास ठेवावे. आता त्या मध्ये चवीनुसार मीठ, साखर घालावी. तिखट आवडत असल्यास थोडे से लाल तिखट व मिरपूड घालावी. आता घट्ट पणा येण्यासाठी वाटी मध्ये 1 चमचा कॉर्न फ्लॉवर घेऊन त्यात थोडेसे पाणी घालून स्लरी बनवून घेणे. ही स्लरी त्या सूप मध्ये मिक्स करावी.5 मिनिटे सूप ला उकळी आणावी.

  6. 6

    आता सूप मध्ये घालण्यासाठी क्रटोन्स करून घेणे.2 ब्रेड स्लाईस चे चौकनी तुकडे करून ते बटर वर दोनीही बाजूने सोनेरी रंगावर भाजून घेणे.

  7. 7

    आता हे गरम गरम सूप क्रटोन्स सोबत सर्व्ह करावे. वरून आवडत असल्यास क्रीम घालून सर्व्ह करावे. खूप छान हॉटेल सारखे सूप तयार होते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Rupali Atre - deshpande
रोजी

Similar Recipes