वालाचे बिरडे (valache birde recipe in marathi)

Manisha Shete - Vispute
Manisha Shete - Vispute @manisha1970
मुंबई

कोकणात हमखास बनणारी भाजी...वाटण न वापरता केलेली वालाची भाजी म्हणजे डाळींबी उसळ... दोन्ही चविष्टच!!!

वालाचे बिरडे (valache birde recipe in marathi)

कोकणात हमखास बनणारी भाजी...वाटण न वापरता केलेली वालाची भाजी म्हणजे डाळींबी उसळ... दोन्ही चविष्टच!!!

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 कपभिजवून सोललेले कडवे वाल
  2. 1मध्यम बटाटा
  3. 1मध्यम टोमॅटो
  4. 1/2 टीस्पून राई
  5. 1/2 टीस्पून जीरे
  6. 1 टीस्पून हळद
  7. 1 टेबल स्पूनतिखट
  8. 1 धणे-जीरे पूड
  9. 1/2 टेबलस्पूनगोडा मसाला
  10. 1 टीस्पून गरम मसाला
  11. 3मिरच्या, कोथिंबीर, आलं- लसूण,३ टेबलस्पून खोबरं यांचे वाटण
  12. 3-4 टेबलस्पूनतेल
  13. पाणी आवश्यकतेनुसार
  14. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्व साहित्य घ्यावे.

  2. 2

    वाटण वाटून घ्यावे. वाल व बटाटा फोडी उकडून घेणे.

  3. 3

    कढईत तेल गरम झाल्यावर राई -जीरे टाकावे. तडतडले की कांदा परतावा. नंतर टोमॅटो व मसाले टाकून परतून घेणे.

  4. 4

    वाटण टाकून तेल सुटेपर्यंत परतावे. मग वालबटाटा टाकून मिक्स करावे. पाणी व मीठ आवश्यकतेनुसार घालून एक घसघशीत उकळी आणावी व गॅस बंद करावा.

  5. 5

    वालाचे बिरडे तयार...भात,चपाती किंवा भाकरी बरोबर छान लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Manisha Shete - Vispute
रोजी
मुंबई

टिप्पण्या

Similar Recipes