क्रिमी टोमॅटो सूप (creamy tomato soup recipe in marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
Kalyan

#soupsnap आपल्या ऑर्थर लता धानापुने ह्यांची टोमॅटो सूपची रेसिपी आज मी बनवली आहे थोडा बदल करून खुपच छान टेस्टी हेल्दी झालीय धन्यवाद लता ताई🙏

क्रिमी टोमॅटो सूप (creamy tomato soup recipe in marathi)

#soupsnap आपल्या ऑर्थर लता धानापुने ह्यांची टोमॅटो सूपची रेसिपी आज मी बनवली आहे थोडा बदल करून खुपच छान टेस्टी हेल्दी झालीय धन्यवाद लता ताई🙏

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१/२ तास
२-३ जणांसाठी
  1. 1कांदा
  2. 1-2तेजपत्ता
  3. 2 तुकडेदालचिनीचे
  4. 2-3मध्यम आकराचे टोमॅटो
  5. 2-3लवंगा
  6. १०-१२ मिरीचे दाणे
  7. 4लसुण पाकळ्या
  8. 1आल्याचा तुकडा
  9. 4-5बिटाचे पिस
  10. 1-2 टेबलस्पूनबटर
  11. 1-2 टेबलस्पूनक्रिम
  12. 1 टीस्पूनसाखर
  13. 1 टीस्पूनतेल
  14. मीठ चविनुसार

कुकिंग सूचना

१/२ तास
  1. 1

    क्रिमी टोमॅटो सूप साठी लागणारे साहित्य प्लेट मध्ये काढुन ठेवा नंतर कांदा, टोमॅटो, आल, लसूण बारीक चिरून ठेवा. मिरीदाणे थोडे ठेचुन बारीक करा

  2. 2

    ऐका कढईत तेल व बटर गरम झाल्यावर खडे मसाले टाकुन परता नंतर त्यात उभा चिरललेला कांदा टाकुन परता त्यातचआलं लसुण टाकुन परतुन घ्या नंतर त्यात चिरलेले टोमॅटो टाकुन चांगले परता

  3. 3

    नंतर त्यात१ कप पाणी टाकुन झाकण ठेवुन५-७ मिनिटे शिजवा

  4. 4

    शिजल्यानंतर त्यातील तेजपत्ता काढुन टाका व मिश्रण थंड करून घ्या

  5. 5

    थंड मिश्रण मिक्सर जारमध्ये ओतुन त्याची पेस्ट करा थोड पाणी मिक्स करून नंतर तयार पेस्ट गाळणीने गाळुन वाटी मध्ये काढा

  6. 6

    टोमॅटोची पेस्ट घट्ट असल्यास थोड पाणी टाकुन पातळ करा व कढईत ओतुन गॅसवर ठेवा त्यात साखर, मीठ, मिरपुड मिक्स करून १० मिनिटे शिजवा आपले सूप रेडी

  7. 7

    अर्ध्या सूपात बिटचे तुकडे पाणी घालुन पेस्ट करून गाळून सुपात मिक्स करा व १ उकळी काढा आपले सूप रेडी

  8. 8

    वाटी मध्ये दोन कलरचे सुप ओतुन वरून क्रिम, मिरपुड, पुदिन्याच्या पानांनी सजवा व बिटाच्या स्लाइजने सजवुन सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
रोजी
Kalyan

टिप्पण्या

Similar Recipes