दुध खिचडी (dudh khichdi recipe in marathi)

Madhuri Shah
Madhuri Shah @madhurishah
Solapur

#kr संक्रांतीच्या सुमारास जर दक्षिण भारतात गेलो, तर बहुतांश घरांतून या दुध खिचडीचा घमघमाट आपल्याला येईल . या लोकप्रिय खिचडीस तिकडच्या बोली भाषेत " शकरी पोंगल " म्हणतात .साजूक तुपात भाजलेली, सुक्यामेव्याच्या दुधात शिजवलेली, अशी ही स्वादिष्ट खिचडी देवाला नैवेद्य म्हणून अर्पण केली जाते व नंतर प्रसाद घेतला जातो .
अशा या पौष्टिक , स्वादिष्ट व पटकन होणाऱ्या खिचडी ची रेसिपी आता आपण पाहू ..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1/2 तास
2   सर्व्हिंगस
  1. 50 ग्रॅमतांदूळ
  2. 1 टीस्पूनमुगडाळ
  3. 50 ग्रॅमकिसलेला गुळ
  4. 150 मिलिलिटरदुध
  5. 50 मिलिलिटरपाणी
  6. 1/2 टेबलस्पूनकाजू पावडर
  7. 1/2 टीस्पूनवेलची पूड
  8. 1/4 टीस्पूनसुंठ पावडर
  9. 1/2 टेबलस्पूनकाजू, बदाम व पिस्त्याचे काप
  10. 1/2 टेबलस्पूनतूप
  11. चवीपुरते मीठ

कुकिंग सूचना

1/2 तास
  1. 1

    डाळ व तांदूळ धुवून निथळत ठेवा. थोडेसे सुकल्यानंतर एका पॅनमध्ये तूप टाकून ते तांबूस रंगावर भाजा. भाजलेली डाळ व तांदूळ एका पातेल्यात काढून घ्या.

  2. 2

    एका पातेल्यात दूध तापवण्यात ठेवा.त्यांत काजू पावडर, वेलची पूड, सुंठपूड व काजू,बदाम, पिस्त्याचे काप घालून दुधास उतू येऊ द्या. पाणीसुद्धा कड़क करून त्यांत गूळ टाकून तो संपूर्णपणे विरघळून द्या.

  3. 3

    भाजलेल्या डाळ - तांदळात, उकळलेले दूध, गुळाचे पाणी व चवीपुरते मी टाकून, ते मिश्रण छान ढवळा व कुकरला लावा.चांगल्या तीन शिट्या होऊ द्या.

  4. 4

    कुकरची वाफ गेल्यानंतर, तयार खिचडी एका बाऊलमध्ये काढा व सर्व्ह करा. सर्व्ह करताना वरुन साजूक तुपाची धार सोडा व मनसोक्तपणे खिचडीची मजा लुटा.स्वादिष्ट, पौष्टिक अशा दूध खिचडीने मन तृप्त होईल.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Madhuri Shah
Madhuri Shah @madhurishah
रोजी
Solapur

Similar Recipes