शाही मँगो राईस (shahi mango rice recipe in marathi)

Madhuri Shah
Madhuri Shah @madhurishah
Solapur

#amr ही रेसिपी मी माझ्या मनाने बनवली आहे .शाही यासाठी कीं , बलवर्धक आंब्याचा पल्प , बहुगुणी सुकामेवा, साजूक तुपात भाजलेला सुगंधी आंबेमोहोर तांदूळ.....
" मॅंगो राईस " केला व तो छान झाला .
‌आंब्याची थीम घेऊन नवनवीन प्रयोग करण्यासाठी प्रेरित करणाऱ्या कूकपॅडचे मनापासून आभार . चला आता ही रेसिपी कशी तयार करतात , ते आपण पाहू ..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1/2तास
1 सर्व्हिंग
  1. 25 ग्रॅमतांदूळ (आंबे मोहर)
  2. 25 ग्रॅमसाखर
  3. 50 मि.लि.लिटरआंब्याचा पल्प(गर)
  4. 25 मिलि लिटरपाणी
  5. 1 टेबलस्पूनकाजू-बदामाचे काप
  6. 1/4 टीस्पूनवेलची पूड
  7. 4काळी मिरी
  8. 2दालचिनी लहान तुकडे
  9. 2लवंग
  10. 1 चिमूटभरजिलेबीचा रंग
  11. चवीपुरते मीठ
  12. 1 टेबलस्पूनतूप

कुकिंग सूचना

1/2तास
  1. 1

    तांदूळ धुवून निथळत ठेवा. ते थोडेसे सुकले कीं, पॅनमध्ये तूप टाकून तापवा.त्यात लवंग,मिरी, दालचिनी टाका.ती फुलून वर आली कीं, त्यांत तांदुळ टाकुन हलक्या हाताने गुलाबी रंगावर भाजा.

  2. 2

    आंब्याच्या पल्प मध्ये साखर टाकून ढवळा. ती विरघळेल. भाजलेले तांदूळ भांड्यात काढा. त्यांत आंब्याचा पल्प, पाणी,1/2 टेबलस्पून ड्रायफ्रूटस, जिलेबीचा रंग वेलची पूड व चवीपुरते मीठ टाका.हे मिश्रण छान ढवळा व ते भांडं कुकरमध्ये ठेवून, तीन शिट्या होऊ द्या.

  3. 3

    कुकरची वाफ गेल्यानंतर भांडे बाहेर काढा. झाला मँगो राईस तयार !
    आता गरमागरम राईस डिश मध्ये सर्व्ह करा. सर्व्ह करते वेळी वरून थोडीशी वेलची पूड व उरलेले काजू - बदामाचे काप पेरा.मस्त अशा शाही मँगो राईसचा आस्वाद घ्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Madhuri Shah
Madhuri Shah @madhurishah
रोजी
Solapur

Similar Recipes