उपवासाची साबुदाण्याची खिचडी (upwasachi sabudana khichdi recipe in marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
Kalyan

#kr घरातल्या सर्व मंडळींचा उपवास म्हटला तर डोळ्यासमोर प्रथम साबुदाण्याची खिचडी च दिसते हो ना सगळ्यांच्या आवडीची व पोटभरीची त्यातील साबुदाणे व शेंगदाणे ही पौष्टीक असतातच साबुदाणे उष्णतेवर नियंत्रण ठेवतात खिचडी खाल्यावर ताजेतवाने वाटते. ब्लडप्रेशर नियंत्रित राहाते. मांसपेशी साठी उपयोगी पोटांच्या समस्या दूर होतात त्यात कॅल्शियम, आयर्न, व्हिटॅमिन भरपुर त्यामुळे हाडे मजबुत होतात त्वचेसाठी फायदेशीर थकवा कमी उर्जा वाढते.
शेंगदाण्यामुळे पोटाचे आजार नष्ट पचनशक्ति वाढते. रक्ताची कमतरता भासत नाही. त्वचेसाठी फायदा होतो . ॲसिडिटीपासून आराम खोकल्यावर उपयुक्त ओमेगा-६ फॅटसुद्धा भरपुर प्रमाणात असते कॅल्शियम व व्हिटॅमिन D जास्त कोलेस्ट्रॉल नियंत्रणात हृदयाचे आजार कमी गर्भावस्थेत बाळाच्या विकासासाठी फायदेशीर चला तर अशा साबुदाणा शेंगदाण्याची उपवासाची पौष्टीक खिचडी कशी बनवली ते बघुया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिटे
३-४ जणांसाठी
  1. 1-2 टीस्पूनजीरे
  2. 3-4मिरच्याचे काप
  3. 1 टीस्पूनआल्याचा किस
  4. 1-2 टेबलस्पूनचिरलेली कोथिंबिर
  5. २० ग्रॅम भाजलेल्या शेंगदाण्यांचा जाडसर कुट
  6. 1 टीस्पूनसाखर
  7. 1 टीस्पूनलिंबाचा रस
  8. चविनुसारमीठ
  9. 1-2 टेबलस्पुनतेल किंवा साजुक तुप
  10. डेकोरेशन साठी फणसाचे गरे
  11. १५० ग्रॅम साबुदाणा
  12. 2-3 टेबलस्पुनगोड दही
  13. 2उकडलेले बटाटे

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    उपवासाची खिचडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य काढुन ठेवा साबुदाणे धुवुन थोड्या पाण्यात रात्रभर भिजत ठेवा त्यामुळे साबुदाणा चांगला फुलतो व सुट्टा होतो बटाटयाची साल काढुन लहान तुकडे करून ठेवा शेंगदाणे भाजुन थंड झाल्यावर सालासकट जाडसर कुट करून ठेवा मिरच्याचे तुकडे करून घ्या

  2. 2

    कढईत तेल गरम झाल्यावर जीरे टाकुन परता नंतर त्यात मिरच्याचे तुकडे टाकुन परता व बटाट्याच्या बारीक फोडी टाकुन परतुन थोडया शिजवा आले किसुन टाका व परता

  3. 3

    साबुदाणे चमच्याने सुट्टे करून त्यात शेंगदाण्याचा कुट मीठ व साखर मिक्स करा व कढईत टाका व चांगले परतुन घ्या व शिजवा

  4. 4

    नंतर त्यात चिरलेली कोथिंबिर टाकुन परता

  5. 5

    आपली उपवासाची साबुदाणा खिचडी रेडी

  6. 6

    गरमगरम साबुदाणा खिचडी बाऊलमध्ये सर्व्ह करा वरून कोथिंबीर व लिंबाची फोड देऊन तसेच गोड दही व ह्या सिजनचे फणसाचे गऱ्यांनी डेकोरेशन करा

  7. 7

    आमच्या फार्मवरच्या फणसाचे ताजे ताजे सुगंधीत फणसगरे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
रोजी
Kalyan

Similar Recipes