मेथीदाणा उसळ (Methidana Usal Recipe In Marathi)

Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
Vashi

#BKR
ही उसळ अतिशय पौष्टिक असते.बाळांतीनीला ही उसळ खायला द्यावी, त्यामुळे कंबर दुःखीच्या समस्या येत नाहीत

मेथीदाणा उसळ (Methidana Usal Recipe In Marathi)

#BKR
ही उसळ अतिशय पौष्टिक असते.बाळांतीनीला ही उसळ खायला द्यावी, त्यामुळे कंबर दुःखीच्या समस्या येत नाहीत

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
2 व्यक्तींसाठी
  1. 100 ग्रॅममेथीचे दाणे
  2. 2मध्यम आकाराचे कांदे
  3. 2-3 टेबल स्पूनओल्या खोबऱ्याचा कीस
  4. 5-6आमसूल /कोकम
  5. 2 टेबल स्पूनगुळ (आवडी नुसार)
  6. 1 टेबल स्पूनलाल मिरची पावडर
  7. 1 टेबल स्पूनगरम मसाला
  8. 1 टीस्पूनराई
  9. 1 टीस्पूनजिरें
  10. 1 टीस्पूनहिंग
  11. 2 टेबलस्पूनतेल
  12. 1 टेबलस्पूनमीठ
  13. 2 टेबलस्पूनकोथिंबीर

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    मेथीचे दाणे स्वच्छ निवडून रात्रभर भिजवून दुसऱ्या दिवशी मोड काढून घेणे

  2. 2

    कांदा लसूण सोलून बारीक चिरुन घ्यावे.गॅसवर पॅनमध्ये तेल तापत ठेऊन त्यात फोडणीचे साहित्य घालून ते तडतडल्यावर त्यात कांदा परतुन घ्यावा.सर्व मसाले घालावेत. हलवून घ्यावे.

  3. 3

    परतलेल्या कांदयात मोड आलेली मेथी घालून ढवळून घ्यावे.

  4. 4

    त्यात कोकम व गुळ, मीठ घालून थोडे पाणी घालावे मंद गॅसवर मेथी दाणे शिजवून घ्यावेत.

  5. 5

    वरून खोबऱ्यचा कीस व कोथिंबीर फहलवी मेथी दाणा उसळ तयार.भाकरी, पोळी, भाताबारोबर सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
रोजी
Vashi
मला पदार्थ बनवायला आणि खिलवायला आवडते.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes