बनाना स्मूदी (banana smoothie recipe in marathi)

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
Nagpur

#Immunity # आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढविणे करिता नेहमी औषधासा रखे पेय किंवा पदार्थ खाऊन कंटाळा आला तर एखादेवेळी, थंड पेय घेण्याची इच्छा होते. अशावेळी, दोन्ही गोष्टी साध्य करण्यासाठी, असे एखादे पेय केले , की बरे वाटते. म्हणून आज बनविलेली ही बनाना स्मूदी.. टेस्ट भी, हेल्थ भी..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 1मोठे केळ
  2. 1 कपदूध
  3. 1 टेबलस्पूनकाजू पूड
  4. 1 टेबलस्पूनबदाम पूड
  5. 10-12किसमिस
  6. 1 टीस्पूनमध
  7. चिमुटभरदालचिनी पूड

कुकिंग सूचना

10 मिनिट
  1. 1

    मोठे एक किंवा लहान दोन केळी घ्यावीत. ती सोलून त्याचे काप करून घ्यावे. आता मिक्सर चे भांडे घेऊन त्यात आधी किसमिस टाकावे.

  2. 2

    काजू आणि बदाम पूड टाकावी. बर्फ टाकावा.

  3. 3

    छान बारीक करून घ्यावे. आता त्यात केळ्याचे काप टाकून पुन्हा फिरवून घ्यावे. आता त्यात मध टाकावे. आणि दालचिनी पूड टाकावी.

  4. 4

    थंड दुध टाकून चांगले फिरवून घ्यावे. स्मूदी तयार आहे.

  5. 5

    आता सर्व्ह करताना काचेच्या ग्लास मध्ये आधी बर्फ टाकून नंतर त्यात तयार स्मूदी टाकावी. वरून केळीचे बारीक काप आणि खजूर काप टाकून थंडगार सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
रोजी
Nagpur

Similar Recipes