कॅरॅमल ब्रेड पुडिंग (caramel bread pudding recipe in marathi)

Rutuja Tushar Ghodke
Rutuja Tushar Ghodke @cook_25671232

कॅरॅमल ब्रेड पुडिंग (caramel bread pudding recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

अडीच तास
चार ते पाच
  1. 7ब्रेड स्लाईसेस
  2. 1/2 कपसाखर कॅरॅमल साठी
  3. 2.5 कप दूध
  4. 1/3 कपसाखर
  5. 1/4 कपकस्टर्ड पावडर

कुकिंग सूचना

अडीच तास
  1. 1

    प्रथम ब्रेडच्या कडा कापून ब्रेडचे तुकडे करून घ्यावे. एका मिक्सरच्या भांड्यात ब्रेडचे तुकडे दोन कप दूध आणि साखर घालावी. ते थोडावेळ तसेच भिजू द्यावे.एका वाटी मध्ये कस्टर्ड पावडर घेऊन, त्यात अर्धा कप दूध घालून चांगले मिक्स करून घ्यावे.

  2. 2

    आता ब्रेड दुध आणि साखर बारीक वाटून घ्यावे. त्यामध्ये कस्टर्ड पावडर चे मिश्रण घालावे. ते चांगले हलवून घ्यावे.

  3. 3

    एका पॅनमध्ये कॅरमल साठी साखर घेऊन ती विरघळवून घ्यावी. त्याचं कॅरमल तयार होईल. एका कुकरमध्ये पाणी घालून, त्यात स्टँड ठेवून ते गरम होण्यास ठेवावे. एका कढईत ब्रेड आणि कस्टर्ड पावडर चे मिश्रण घालून ते एकसारखे हलवत राहून घट्ट करून घ्यावे.

  4. 4

    आपले तयार झालेले कॅरॅमल एका टीनमध्ये घालून बेसला सगळीकडे पसरवून घ्यावे. तीन ते चार मिनिटे सेट होण्यास ठेवावे. त्यावर ब्रेडचे घट्ट झालेले मिश्रण घालावे. ते व्यवस्थित सगळीकडे पसरून घ्यावे. त्यावर सिल्वर फाईल लावावी.

  5. 5

    हे भांडे गरम झालेल्या कुकरमध्ये स्टॅंडवर ठेवावे. भांड्यावर एक त्यावर पूर्ण झाकेल एवढी प्लेट ठेवावी. कुकरचे झाकण लावून मध्यम आचेवर चार शिट्ट्या करून घ्यावा.

  6. 6

    कुकर गार झाल्यावर पुडिंग चे भांडे बाहेर काढावे. ते गार होऊ द्यावे व फ्रिजमध्ये दोन तास सेट होण्यास ठेवावे. हे भांडे ताटात पालथी करून घ्यावे व चाकूने त्याचे हवे तेवढे पीसेस करून घ्यावे. तयार आहे कॅरामल ब्रेड पुडिंग.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rutuja Tushar Ghodke
Rutuja Tushar Ghodke @cook_25671232
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes