गव्हा ची खीर (gavyachi kheer recipe in marathi)

Ulka Kulkarni @Ulkamaee123
लहापणापासून मी माझ्या आईच्या हातची खीर आवडीने खात आले आहे. आता माझी आई गेल्यानंतर तिला तिच्या पाक कृतींमधून आठवणीत ठेवण्याचा आणि हे संस्कार पुढच्या पिढीत रुजवयाचा हा एक पर्याय
गव्हा ची खीर (gavyachi kheer recipe in marathi)
लहापणापासून मी माझ्या आईच्या हातची खीर आवडीने खात आले आहे. आता माझी आई गेल्यानंतर तिला तिच्या पाक कृतींमधून आठवणीत ठेवण्याचा आणि हे संस्कार पुढच्या पिढीत रुजवयाचा हा एक पर्याय
कुकिंग सूचना
- 1
गहू आणी तांदुळ कुकर मध्ये शिजवून घेणे आणि एका कढई मधे काढणे
- 2
गूळ आणि साखर मिसळून 10-15मिनिटं मंद आचेवर हलवत ठेवावे. गूळ आणि साखर विघालेपर्यंत हलवत रहा.
- 3
गॅस बंद करून पूर्णपणे थंड करावं आणि दूध, वेलदोडे काजू मनुके आणि केशर घालून खायला द्यावे. आवडीनुसार खीर फ्रिज मधे थंड करून सुद्धाखाऊ शकतो.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi)
#cpm4गव्हाची खीर प्रमुख्याने खपली गव्हाची करतात. खपली गव्हाची खीर चवीला खुपच छान लागते त्याच बरोबर खपली गव्हामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. या खीरी मध्ये गुळ घालतात त्यामुळे तिची पौष्टिकता अजूनच वाढते चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi)
#cpm4#week 4#रेसिपी मॅगझीन# गव्हाची खीर Rupali Atre - deshpande -
गव्हाची गुळातली खीर (gavyachi gulatil kheer recipe in marathi)
पारंपरिक पद्धतीने बनविलेली नागपंचमी साठी गव्हाची गुळातली खीर. Shilpa Wani -
गव्हाची व तांदळाची खीर (KHEER RECIPE IN MARATHI)
#आई 10मे जागतिक मातृ दिवस🌹 "स्वामी तीनही जगाचा आई विना भिकारी" हा दिवस माझ्यासाठी एकदम खास आहे जर आईने जन्म दिला नसता तर कदाचीत मी हे जग पाहिले नसते. आम्हा मुलांना लहानाचा मोठे करताना आईने तीची आवड निवड बाजूला ठेवून आमचे सगळे हट्ट पुरविले.माझ्या आईला खायला जे काही आवडते त्यात तीला गव्हाची खीर खुप आवडते...तीच खीर कशी करावी हे मी तुमच्याशी शेअर करते..😊 Nikita Achchha -
गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi)
#cpm4गव्हाची पौष्टीक खीर अगदी खमंग लागते.अगदी साधी व सोपी रेसिपी आहे.मला साताऱ्याचा सज्जनगड म्हणले की तिथली प्रसादाची गव्हाची खीर आठवते.एकदा सज्जनगडला गेले असताना समाधीचे दर्शन घेतले.खूपच उशीर झाला होता.दुपारी भोजनप्रसाद असतो,तो घ्यायला गेलो तर जिथे पंक्ती बसतात तिथली दारं बंद!आईने जाऊन तेथील बुवांना विनंती केली.लांबून आलो आहोत आणि भूकही लागली आहे...निदान थोडा थोडा तरी प्रसाद मिळावा.त्यांनी जाणले व प्रेमाने आम्हाला जेवायला बसवले...फक्त आज खीर होती ती मात्र बहुतेक संपली आहे.आमटीभात मिळेल...म्हणलं,ठीक आहे!आमटीभात संपवत असतानाच छोट्या कावळ्यात शिल्लक गव्हाची खीर होती ती वाढप्यांनी आणून वाढली.अगदी डाव डाव सगळ्यांना!आम्हाला आश्चर्य वाटले...तेवढ्यात वाढप्यांनीच सांगितले थोडी बाजूला काढली होती तीच वाढलीये.श्री रामदासकृपाच झाली म्हणायची!फक्त गूळ आणि गव्हाचा दलिया थोडे वेलदोडे अशी अमृततुल्य खीर अजूनही डोळ्यापुढे येते.श्रीरामांनी आम्हाला विन्मुख पाठवले नाही.पुढे या रामदासांच्या दासबोधाचा आईने खूप अभ्यास करुन "उपासक" ही पदवी मिळवली."श्रद्धा जेथे..तेथे राम"याची प्रचिती आली.गव्हाची खीर करताना मला ही आठवण नेहमीच येते! Sushama Y. Kulkarni -
गव्हाची लापशी (gavyachi lapsi recipe in marathi)
#wdWomens day निम्मित मी ही रेसिपी dedicate करतेय माझ्या मुलींसाठी आणि माझ्या दोन्ही नातींसाठी. Surekha vedpathak -
तांदळाची खीर (tandlachi kheer recipe in marathi)
#cpm3खीरिशी माझी ओळख करून दिली ती माझ्या एका मारवाडी मैत्रिणीने तेंव्हा पासून मी ही खीर नियमित करते. सगळ्यात सोपा गोडाचा पदार्थ म्हणजे तांदळाची खीर आणि ही खीर अगदीच मोजक्या साहित्यात होते व लहानां सहित ज्येष्ठांना ही खाता येते. या तांदळाच्या खिरीशी माझ्या तर खूपच जवळच्या आठवणी आहेत प्रेग्नेंसी मध्ये मला जेव्हा काही खावेसे वाटत नव्हते तेव्हा माझा हक्काचा आणि पटकन होणारा पदार्थ म्हणजे ही खीर चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
झटपट शेवई खीर (seviya kheer recipe in marathi)
#gpr#गुरूपौर्णिमा स्पेशल रेसिपी "झटपट शेवई खीर"" गुरु ब्रम्हा गुरु विष्णू, गुरू देवो महेश्वरा, गुरू साक्षात परब्रम्ह, तस्मै श्री गुरुवे नमः गुरु विन भाव... गुरु विन देव..कोण अशी.. आपल्या मनातील भाव,सुख, दुःख समजणारा, आपल्याला मायेची सावली देणारा,आपली काळजी वाहणारा, वेळोवेळी मार्गदर्शन करणारा, शिकवण,समज देणारा असा आपला गुरु असतो... मी तर म्हणेन आपण या जिवनात नेहमीच शिष्य आहोत,कोणी ना कोणी आपला गुरु शेवटपर्यंत असतोच म्हणजे आपण शेवटपर्यंत शिकत असतो..जसे की बालवयात आई वडील, आजी आजोबा, आत्या, मावशी असे सगळेच गुरू असतात,ते आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करत असतात..पण असं काही नाही की आपण आपल्या पेक्षा वयाने मोठ्या असलेल्यांना च गुरू मानले पाहिजे.. आपल्या पेक्षा लहान सुद्धा आपल्याला कधी कधी योग्य सल्ला देतात, शिकवतात.... म्हणून मी सगळ्या लहान थोरांना माझे गुरू मानते.. आपल्या या कुकपॅड ग्रुपमध्ये अनेक नवनवीन पदार्थांची रेसिपीजची ओळख तुम्ही करून देता, तुम्ही सुद्धा माझे गुरू आहात.. आज मी ही रेसिपी माझी आई, मावशी या गुरुंना समर्पित करायची आहे.. पुर्वी आई, मावशी शेवया बनवण्याचा लाकडी पाटावर दरवर्षी उन्हाळ्यात शेवया बनवायची.. खुप सुंदर असायच्या त्या शेवया, हल्ली तर बघायला ही मिळत नाही..गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी तशी गत झाली आहे..तर ही रेसिपी मी माझ्या आई व मावशीला माझ्या हातची पहिल्यांदा खाऊ घातली होती.. खुप आवडली होती दोघींनाही..आज या जगात नाहीत,पण गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने ही रेसिपी बनवुन त्यांची आठवण आणि खीर खाऊन त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान हेच माझ्या स्वैयंपाकाच्या आवडीचे कौतुक आणि पाठीवर मायेने फिरलेल्या हातांचे शतशः आभार मानते...🙏 लता धानापुने -
नारळाची खीर (naralachi kheer recipe in marathi)
#rbrआज मी नारळी पौर्णिमा करता एक रेसिपी सादर करत आहे. सगळे नारळी भात व नारळाच्या वड्या करतात पण मी आज तुमच्या समोर सादर करत आहे नारळाची खीर. ही माझ्या भावाला खूप आवडते म्हणून मी त्याच्यासाठी आज ही खीर बनवत आहे. Sarita Nikam -
शेवैया ची खीर (शिर खुरमा) (seviya chi kheer recipe in marathi)
#VSM: अक्षय तृतीया निमिते आज गोड काय करणार तर माझ्या मुलाला गोड खीर फार आवडते म्हणून खीर बनवणार. खीर पुरी च जेवण , सगळे जेवायला या. Varsha S M -
कणिकेची खीर (kankechi kheer recipe in marathi)
#md आई जिच्या पासून आपलं आयुष्य सुरु झालं.. तिनेच लहानाचे मोठे केले. आज त्या माऊली कडूनच मी सगळं काही शिकले तिच्या हातची मला लहानपणा पासून आवडणारी ही खीर मी आज बनविली आहे. ही खीर माझ्या घरी कणिक/तांदूळाचे पीठ आणि साखर/गूळ वापरून करतात. मी लहान असताना माझ्या आजोबांना जेवायची इच्छा नसायची तेव्हा आई ही खीर बनवाची म्हणून मी या खीरीला आजोबांची खीर असेही म्हणायचे. ही खीर खूप पोष्टीक तर आहेच तसेच ती नाष्टासाठी उत्तम पर्याय आहे. मी खीर माझ्या मुलीला बाळ असताना (काजू बदाम न वापरता/काजू बदाम पूड वापरून) करून द्यायचे ,तसेच खीर गार झाल्यावर मी माझ्या मुलीचं vitamin औषध घालून द्यायचे. Rajashri Deodhar -
साबुदाण्याची खीर (Sabudana kheer recipe in marathi)
#EB15 #W15विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड साबुदाणा खीर या कीवर्ड साठी मी आज माझी रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi)
#cpm4#गव्हाची खीर म्हणजे मी जाड दलिया घेतलाय .मधुमेही लोकांसाठी करायची असेल तर हीच खीर करा थोडी कमी गोड किंवा शुगरफ्री वापरून पण छान होते . Hema Wane -
शेवया ची खीर (shevyachi kheer recipe in marathi)
शेवया ची खीर ही माझी आवडती डिश आहे. आणि सोप्पी पण... माझी आजी करायची खूप छान खीर. ती चव रेंगाळत आहे. #फोटोग्राफी Dhyeya Chaskar -
आईसाठी गाजराची खीर (KHEER RECIPE IN MARATHI)
#आईआईच्या हातच्या सर्व डिश मला आवडतातच . पण मातृदिनाच्यादिवशी खास मी तिच्यासाठी गाजराची स्पेसिअल खीर बनवली आहे ती आज तुम्हाला दाखवत आहे , कशी वाटते ते पहा . Kranti Ahaley -
अमृततुल्य (खीर) (kheer recipe in marathi)
#आईआईचे स्थान प्रत्याकाच्या आयुष्या मध्ये खूप महत्वाचे असते . तिच्यासाठी काय करू आणि किती करू असे मला नेहमीच वाटते .९ मे ला मातृ दिन आहे . त्यादिवशी मी तिची लाडकी लेक तिच्यासाठी खास तिच्या आवडीची अमृततुल्य (खीर ) खीर बनवणार आहे .तिला नक्कीच आवडेल करून पहा . Shubhangi Ghalsasi -
-
कोहळयाची खीर (kohlyachi kheer recipe in marathi)
#rbrश्रावण शेफ वीक २भरपूर वेळा बहीण भावांची आवड-निवड वेगवेगळी असते. पण आधीची परिस्थिती काहीशी अशी होती की आई बाबा जे म्हणतील ते... घरात जे उपलब्ध असेल त्यातच कमीत कमी खर्चात आई सण करायची. त्यातील आम्हा चारही भावंडाना आवडणारा पदार्थ म्हणजेच खीर पुरी.... अगदी पोटभर आणि आवडीने खायचो आम्ही लहानपणी... आता एवढे पदार्थ असतात... की कोहळयाची खीर वर्ष भरातून एखादे वेळेसच होते. Priya Lekurwale -
गव्हाची खीर (gavyachi kheer recipe in marathi)
#cpm4#week4#रेसिपी_मॅगझीन#गव्हाची_खिरहि गव्हाची खीर माझ्या आई च्या घरी मोहरम ला दरवर्षी बनवली जाते ,त्या खीर ला गोड खिचडाही म्हणतात,आणि मी फक्त माझ्या आईने बनवलेलीच गव्हाची खीर खाल्ली होती, पण आज मी स्वतः पहिल्यांदा बनली तेही कुकपॅड मुळे , खुप छान झाली आहे हेल्दी पण आणि टेस्टी पण 😋 Jyotshna Vishal Khadatkar -
गरवा खीर (garva kheer recipe in marathi)
#फोटोग्राफी #आईहे नावच इतके छान आहे गरबा खिरी.खूपच सप्टेंबर आणि यमी आणि हेल्दी रेसिपी आहे. गरबा म्हणजे गहूचा रवा यापासून बनवलेली खीर म्हणून गरबा खीर संबोधले आहे.हा पदार्थ सुद्धा बाळंतिणी आणि पिरेड च्या काळामध्ये हा आवश्य खायला द्यावा असा आहे. या पदार्थांमुळे शरीरातील लोहाचे प्रमाण वाढते आणि शरीरातली ताकद आणि शक्तीही वाढते. अतिशय पौष्टिक खीर असते ही.माझ्या आईकडूनच मीही शिकल्यामुळे मीही आईसाठी डेडीकेट करते. हा पदार्थ ही महिलांसाठी विशेष उपयोगी उपसा असल्याने मदर्स डे च्या निमित्ताने मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. चला बघूया या खिरीची रेसिपी Sanhita Kand -
बुंदी खीर (boondi kheer recipe in marathi)
#CDYबुंदी खीर ही माझी आवडती रेसिपी तशीच ती माझ्या मुलांना ही आवडती रेसिपी. दिवाळी फराळाचे बुंदीचे लाडू उरले की मी नेहमी त्याची खीर बनवते ही खीर खूप छान बनते. चला तर मग बनवूयात बुंदीची खीर. Supriya Devkar -
तांदळाची खीर (Tandalachi Kheer Recipe In Marathi)
#कुक स्नॅप रेसिपी#तांदळाची खीर (दूध पाक)मी प्रिती साळवी यांची रेसिपी कुकस्नॅप केली आहे Anita Desai -
केशरी शाबुदाणा खीर (kesari sabudana kheer recipe in marathi)
#nrrउपवासासाठी पौष्टिक अशी ही शाबुदाना खीर खुपचं छान लागते. आणि यात केशर आणि ड्राय फ्रूट असल्यामुळे ही खीर अतिशय सुंदर लागते चला तर पाहूया या खीरीची रेसिपी. Ashwini Anant Randive -
दलिया खीर (daliya kheer recipe in marathi)
#tri दलिया खीर ही अत्यंत हेल्दी व टेस्टी लागते यात गुळातून बी कॉम्प्लेक्स दुधातून कॅल्शिअम व गव्हात भरपूर प्रमाणात ग्लूटीन असते त्यामुळे ही खीर खूपच हेल्दी आहे. ड्रायफ्रूट्स वेलची पावडर ,जायफळ व नारळामुळे चविष्ट खीर तयार होते. लहान व मोठ्यांना ही खीर खूप आवडते..... पाहुयात कशी करायच ती .... Mangal Shah -
बासुंदी रेसिपी (basundi recipe in marathi)
#md#MothersDaySpecial🥰आईच्या हातचे सर्वच पदार्थ खूप छान होत होतें ती सर्वच पदार्थ खूप चांगले करत असे.पण तिच्या हातची बासुंदी खूप अप्रतिम अशी व्हायची मला आठवतं माझ्या लहानपणी आमच्या घरी कोणीही पाहुणा आला तरी बासुंदी म्हणून पाहुणचार व्हायचा तेव्हा खूप मोठे भांडे व त्यात आठ दहा लिटर दूध आई तापवायला ठेवायची आमचं कुटुंब पण मोठं होतंत्यात ती दूध उतू जाऊ नये म्हणून बशी सारख यंत्र टाकायची आम्हाला मजा वाटायचीआज मदर्स डे निमित्त तिच्या आठवणीत रेसिपी करते आज ती जर असती तर तिला खूप आनंद झाला असता मी कूकपॅड जॉईन केले व त्यावर माझ्या सर्व रेसिपी बघून Sapna Sawaji -
सफरचंदाची खीर (safarchandachi kheer recipe in marathi)
#CookpadTurns4-CookwithFruits- आज मी फ्रुट मधील सफरचंद हे फळ घेऊन त्याची खीर बनवली आहे. Deepali Surve -
तांदुळाची खीर (tandul kheer recipe in marathi)
खर तर ही खीर नेहमीच पितृपक्षात केली जाते पण माझ्या कडे खूपदा होते कारण माझ्या मुलाची आवडती . Hema Wane -
रवा शेवई खीर (rava shevai kheer recipe in marathi)
#mdलहान असताना नेहमी गोड विकत आणायला जमत नसे तेव्हा आई घरात मस्त मस्त वेगवेगळ्या खीरी बनवत असे छान साजूक तूप, दूध,सुका मेशा यांचा वापर त्यात असे पोटभर खाता येईल येवढी बनवली जात असे. ती खीर आजही खूप आवडीने मी खाते. Supriya Devkar -
बुंदी खीर (लाडूपासून बनवा मस्त खीर) (Left Over Boondi Ladoo Kheer Recipe In Marathi)
दिवाळीचा फराळ झाल्यानंतर बऱ्याच जणांचे लाडू शिल्लक राहतात अशावेळी तुम्ही त्या लाडूंपासून बुंदीची खीर बनवू शकता ही खीर इतकी छान लागते आणि एक वेगळ्या पदार्थ म्हणून तुम्ही खाऊ शकता बनवायला अगदीच सोपी आहे आणि कमी पदार्थांमध्ये ही खीर बनते चला तर मग बनवूया बुंदीची खीर Supriya Devkar -
ड्रायफ्रूटस लोडेड शेवयांची खीर(Shevayachi Kheer Recipe In Marathi)
#MDR " ड्रायफ्रूटस लोडेड शेवयांची खीर " माझी आई खीर बनवण्यामध्ये एक्स्पर्ट... तिलाही खीर खायला खूप आवडायची...पण सध्या मधुमेह डिटेक्ट झाल्याने गोड खाण सक्तीने बंद केलंय... पण मग मातृदिनाच्या निमित्ताने आई ची आवडती खीर बनवली, माझ्या आईला खिरीचे सर्व प्रकार आवडतात....!! त्यातील एक बारीक शेवयांची खीर..👌👌 Shital Siddhesh Raut
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14989986
टिप्पण्या