सावजी मसाला (Saavji Masala recipe in marathi)

Supriya Vartak Mohite
Supriya Vartak Mohite @SupriyAmol
Mumbai and Anand

#KS3 (#Week3 #Recipe1)

विदर्भ खाद्यसंस्कृतीची एक स्वत:ची अशी वेगळी ओळख आहे,... वेगळेपण आहे... आणि हेच वेगळेपण सामावलयं... *वऱ्हाडी* किंवा *सावजी* नावाने प्रसिद्ध असलेल्या *नागपूरी Cuisine* मध्ये... ज्याच्या झणझणीत,.. तिखट,.. चटकेबाज चवीला जगात तोड नाही... !!

अरे, पण खवय्यांनो..!!, तुम्हाला हे माहित आहे का?... या झणझणीत, तिखट चवीचे रहस्य लपलयं... विदर्भ स्पेशल *सावजी मसाला* यामध्ये...!! 😊

प्राचीन काळापासून, *सावजी* समुदायाकडून मिळालेली ही, तिखटाची देणगी... दरएक नागपूरी वेज-नॉनवेज रेसिपीज् मध्ये हमखास असतेच... कारण, अहो..!! याशिवाय *वऱ्हाडी* खानपान अपूर्णच नाही का...!! 😊

*मग, चला ना बे....पोट्टे हो...नुसतं बगून-वाचून राहिले का....*
नागपूरी पाककलेची *आन-बान-शान*...सावजी मसाला *करुन राहिले ना मी...*
*तुमी काहुन वेळ घालवून राहिले .... घ्या की, पटापटा बनवायले...* 😊👍🏽©Supriya Vartak-Mohite

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनीटे
४-५ जणांसाठी
  1. १०-१५ लाल सुक्या मिरच्या (पटणी मिरची)
  2. 1/2कप किसलेले सुकं खोबरं
  3. 7-8लवंग
  4. 4-5हिरवी वेलची
  5. 3-4तुकडे दालचीनी
  6. 3मोठी वेलची
  7. 3तमालपत्र
  8. 2बदाम फूल /चक्री फुल
  9. 2जावित्री
  10. 3टेबलस्पून धणे
  11. 2टेबलस्पून दगडफुल
  12. 1टेबलस्पून काळीमिरी दाणे
  13. 1टेबलस्पून जीरे
  14. 1टेबलस्पून शहा जीरे
  15. 1टेबलस्पून बडीशेप
  16. 1टेबलस्पून खसखस
  17. 1टेबलस्पून तीळ
  18. 1टेबलस्पून चणा डाळे
  19. 1टेबलस्पून तांदूळ
  20. 1/2टीस्पून जायफळ पावडर

कुकिंग सूचना

२० मिनीटे
  1. 1

    प्रथम एका पॅनमध्ये सुक्या मिरच्या भाजून घ्याव्यात. मग खसखस सोडून बाकी सर्व खडा मसाला साहित्य खमंग भाजून घ्यावे.

  2. 2

    आता पॅनमध्ये सुकं खोबरं, तांदूळ, चणा डाळे भाजून घ्यावे आणि गॅस बंद करुन, त्यात खसखस व जायफळ पावडर घालून परतून घ्यावे.

  3. 3

    वरील भाजलेले मिश्रण थंड झाल्यावर, सर्व साहित्य एकत्र करुन मिक्सरमधून बारीक दळून घ्यावे.

  4. 4

    नागपूर स्पेशल झणझणीत तिखट सावजी मसाला तयार.... दळलेला मसाला थंड झाल्यावर, हवाबंद डब्यामधे भरुन ठेवावा आणि रस्सेदार, तरीवाल्या कोणत्याही रेसिपीज् मध्ये वापरता येतो.

    वरील साहित्यात साधारणतः १००-१५० ग्राम मसाला होतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Supriya Vartak Mohite
रोजी
Mumbai and Anand
Explore & Nurture the Creativity within you through Tasty Recipes 💃😋👍😋
पुढे वाचा

Similar Recipes