मँगो ग्लेज केक (mango glaze cake recipe in marathi)

Shweta Amle
Shweta Amle @cook_22142786

#मँगो केक तर मी बर्‍याचदा केलेला आहे पण आयसिंग कधीच केलेल नाही. आयसिंगचा हा माझा पहिल्यांदाच प्रयत्न. जमलं की नाही हे तुम्हीच सांगा😀

मँगो ग्लेज केक (mango glaze cake recipe in marathi)

#मँगो केक तर मी बर्‍याचदा केलेला आहे पण आयसिंग कधीच केलेल नाही. आयसिंगचा हा माझा पहिल्यांदाच प्रयत्न. जमलं की नाही हे तुम्हीच सांगा😀

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 कपमैदा
  2. 1/4 कपपिठीसाखर
  3. 1/4 कपरिफाइंड ऑइल
  4. दीड कप दूध
  5. 1 टी स्पूनव्हॅनिला इसेन्स
  6. 1 टेबल स्पूनबेकिंग पावडर
  7. मँगो ग्लेजसाठी
  8. 1मोठा आंबा
  9. 1/2 कपसाखर
  10. केकच्या आयसिंग करण्यासाठी
  11. 1 कपक्रीम
  12. 1 टीस्पूनव्हॅनिला इसेन्स
  13. 5 टेबल स्पूनपिठीसाखर

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वप्रथम मी आंब्याचा ग्लेज तयार करून घेतला. आंब्याच्या ग्लेजसाठी आंब्याची साल काढून घ्यावेत व त्याचे काप करून मिक्सरमधून त्याचा गर काढून घ्यावा. नंतर एका कढईमध्ये आंब्याचा गर व साखर टाकून घट्ट येईपर्यंत चमचा घोटत राहावा व त्याचा सॉस तयार करून घ्यावा आणि थंड करण्यासाठी ठेवावा.

  2. 2

    आता केक साठी प्रथम एक कप मैदा चाळणीने चाळून घ्यावा व त्यामध्ये वरील दिलेल्या प्रमाणे बेकिंग पावडर,सोडा, पिठीसाखर, रिफाइंड ऑइल, दोन टेबल स्पून आंब्याचा सॉस,दूध, व्हॅनिला इसेन्स हे सगळं क्रमाक्रमाने टाकून छान फेटून घ्यावे.

  3. 3

    ' आता केक टीन ला बटरने ग्रीस करून घ्यावे.त्यानंतर बटर पेपर लावून परत बटर ने ग्रीस करून घ्यावे. नंतर केक बॅटर त्यामध्ये टाकून पाच-सात वेळा टॅप करून घेणे. जेणेकरून एअर पकडणार नाही. हे सगळं करण्याआधी कढईला प्री-हीट करून घेणे.

  4. 4

    कढई प्री हिट झाल्यावर त्यामध्ये केकटीन ठेवून केक ला पन्नास मिनिटे होऊ द्यावे व त्यामध्ये टूथपिक टाकून बघावे की आपला केक बेक झाला की नाही. इकडे केक बेक होत होईपर्यंत आपण आयसिंग ची तयारी करून घ्यावी.

  5. 5

    आयसिंग साठी फ्रेश क्रिम घ्यावे व त्यामध्ये एक एक चमचा थोडी थोडी पिठी साखर टाकून फेटून घ्यावे. आयसिंग तयार झालं की कोन मध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून द्यावे.

  6. 6

    मी केक थंड झाल्यावर त्याला अर्धा कट करून खालच्या भागाला क्रीम लावले व त्यावर आंब्याचा ग्लेज लावला आणि मग त्यावर केकचा वरील भाग जॉईन करून घ्यावा.

  7. 7

    मग वरील भागाला लावलेल्या मँगो ग्लेजवर आपल्या मनाप्रमाणे डिझाईन काढून घ्यावी. मग केक ला पंधरा-वीस मिनिटे फ्रीजमध्ये ठेवून द्यावे आणि मग कट करून खायला घ्यावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shweta Amle
Shweta Amle @cook_22142786
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes