रवा बटाटा पॅनकेक (rava batata pancake recipe in marathi)

सुप्रिया घुडे
सुप्रिया घुडे @cook_SupriyaGhude97
वसई

खालील ३ पाककृतींचा संदर्भ घेत मी हि पाककृती सादर करत आहे - "रवा बटाटा pancake" :)
१. आलू की रोटी (Aloo ki roti recipe in Hindi) by Neelam Agrawal
२. बटाटा रोष्टी by Mamta Shahu
३. रवा बटाटा पॅन केक (rawa batata pancake recipe in marathi) by Sujata Gengaje

रवा बटाटा पॅनकेक (rava batata pancake recipe in marathi)

खालील ३ पाककृतींचा संदर्भ घेत मी हि पाककृती सादर करत आहे - "रवा बटाटा pancake" :)
१. आलू की रोटी (Aloo ki roti recipe in Hindi) by Neelam Agrawal
२. बटाटा रोष्टी by Mamta Shahu
३. रवा बटाटा पॅन केक (rawa batata pancake recipe in marathi) by Sujata Gengaje

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ तास
१० पॅनकेक्स
  1. 10-12छोटे उकडलेले बटाटे
  2. 2तिखट हिरव्या मिरच्या
  3. 1/4 कपचिरलेली कोथिंबीर
  4. 1टोमॅटो
  5. 1कांदा
  6. 3-4काळीमिरी (पावडर)
  7. 1 चमचालाल तिखट मसाला
  8. 1 चमचाजीरे पावडर
  9. 1 चमचाधणे पावडर
  10. 1-2 टीस्पून मीठ (चवीनुसार)
  11. 1क्यूब चीज
  12. 1/4 कपपाणी
  13. फ्राय करण्यासाठी खाद्यतेल

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    १० -१२ छोटे बटाटे उकडून घ्यायचे. बटाट्यानं काटे चमच्याने टोचून उकाडवले, त्यामुळे ते लवकर शिजतात.

  2. 2

    उकडलेले बटाटे मॅश करून घेतले. २ तिखट हिरव्या मिरच्या, १ टोमॅटो, १ कांदा बारीक कापून घेतले.

  3. 3

    आता सर्व मिश्रण एकत्र केलं. त्यात पाव कप चिरलेली कोथिंबीर, ३-४ काळीमिरी (पावडर), १ चमचा लाल तिखट मसाला, १ चमचा जीरे पावडर, १ चमचा धणे पावडर, १-२ चमचे मीठ (चवीनुसार) घातलं. पाव कप पाणी घालून सगळं मिक्स केलं.

  4. 4

    १ क्यूब चीज किसून मिश्रणात एकजीव केलं.

  5. 5

    पॅन गरम करून तेलाने ब्रश करून घेतलं. त्यावर एक डावली मिश्रण घेऊन काविलत्याने पॅन वर समान रीतीने पसरवलं. आणि झाकून ठेवलं.

  6. 6

    आच माध्यम ठेवायची. एक बाजू व्यवस्थित शिजली कि पॅनकेक परतून दुसरी बाजू सुद्धा शिजवून घ्यायची. झाकण ठेवून द्यायचं.

  7. 7

    तयार पॅनकेक्स चा सॉस सोबत आस्वाद घ्यायचा :)
    ~ सुप्रिया घुडे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
सुप्रिया घुडे
रोजी
वसई
🇮🇳👰Independent Women👩🏻‍💻Software Programmer👯Traveller👸Explorer👰Foodie👱Artist📖Book Lover / Reader📝Lifetime Learner🇮🇳
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes