स्पॅनिश ऑम्लेट (spanish omelette recipe in marathi)

Smita Kiran Patil
Smita Kiran Patil @myrecipe_2249
Sanpada Navi Mumbai

#pe बटाटा आणि अंडा याचा रेसिपीची कॉन्टॅक्ट चालू आहे तर हे दोन्ही मिळून एक रेसिपी बनवले आहे स्पॅनिश ऑम्लेट यामध्ये बटाटा आणि अंडा दोन्ही चां वापर केला आहे अंडा आणि बटाटा आपल्या हेल्थ साठी खूप चांगला आहे मुलांना आवडणारी झटपट होणारी ही रेसिपी आहे नक्की करून पहा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

अर्धा तास
दोन लोकांसाठी
  1. 3अंडे
  2. 2बटाटे
  3. 1कांदा
  4. चिली फ्लेक्स
  5. मिरपूड
  6. चवीपुरते मीठ

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    प्रथम बटाट्याच्या साले काढून बारीक तुकडे करून घ्या आता हे पॅनवर तेल टाकुन बटाटा फ्राय करायला ठेवा फ्राय केलेला बटाटा प्लेटमध्ये काढून घ्या आता त्यामध्ये कांदा फ्राय करायला टाका

  2. 2

    फ्राय केलेला कांदा प्लेटमध्ये काढून घ्या आता अंडी फोडून घ्या त्यामध्ये चवीपुरतं मीठ मिरपूड चिली फ्लेक्स घाला तुम्ही पुदिन्याची पाने पण टाकू शकता माझ्याकडे बेझीललिव्हज होते ते मी यामध्ये टाकले हे सगळं चांगलं बिटर ने मिक्स करून घ्या चांगले फेटून घ्या

  3. 3

    आता आता या फेटलेल्या मिश्रणामध्ये तळलेला कांदा आणि बटाटा घालून मिक्स करा आता पॅनवर थोडेसे तेल टाकून त्यावर त्यातील अर्धे मिश्रण घाला त्यावर किसलेले चीज घाला आणि उरलेलं मिश्रण त्यावर ओता आणि तेल सोडून दोन मिनिटे झाकून ठेवा

  4. 4

    झाकण ठेवून एक वाफ आल्यानंतर अलगत प्लेटमध्ये आमलेट काढून घ्या दुसर्‍या बाजुनी पॅनवर हे आमलेट टाका परत थोडं तेल टाकून दोन मिनिटे चांगले भाजून घ्या वरून तुम्ही अजून चीज टाकू शकता टोमॅटो सॉस बरोबर चपातीबरोबर ब्रेडबरोबर खायला द्या

  5. 5

    सुरीने तुकडे करून सॉस बरोबर खायला द्या मुलांना चीज घातल्यामुळे खूपच आवडते नक्की करून पहा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Smita Kiran Patil
Smita Kiran Patil @myrecipe_2249
रोजी
Sanpada Navi Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes