स्पॅनिश ऑम्लेट (omelette recipe in marathi)

Vandana Shelar
Vandana Shelar @cook_26261725
नवी मुंबई

#GA4  #week 2 प्रीती फडके पुरानिक यांनी या आठवड्यात स्पॅनिश आमलेट रेसिपी cookpad मराठी वर अपलोड केली आहे त्यांची रेसिपी बघून कुकस्नॅप साठी मी ही रेसिपी निवडली, खूपच सोपी आणि झटपट होणारी ही ऑम्लेट ची रेसिपी आहे .लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल असे ऑम्लेट आहे यामध्ये मी जास्ती च्या भाज्या घेतल्या आहेत त्यामुळे व्हेजिटेबल नी भरलेले हेल्दी ऑम्लेट तयार होते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
2 जणासाठी
  1. 1उकडलेला बटाटा
  2. 1मध्यम आकाराचा कांदा
  3. 1अंड
  4. 1/4 टीस्पूनमिरेपुड
  5. 1 टीस्पूनचाट मसाला
  6. 1/2 टेबलस्पूनचिरलेली कोथिंबिर
  7. 1हिरवी मिरची
  8. 2 टेबलस्पूनबटर
  9. 1चीझ क्युब
  10. चवीनुसार मीठ
  11. 1सिमला मिरचीचे बारीक तुकडे
  12. 3 टेबलस्पूनमक्याचे दाणे

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    प्रथम उकडलेला बटाटा कुस्करुन घ्यावा. कांदा चिरुन घ्यावा. मग त्यात हित्वी मिरची, सिमला मिरचीचे तुकडे, मक्याचे दाणे हे मिक्स करुन घेणे

  2. 2

    आता वरील मिश्रणात अंड फोडून घालावं त्यामध्ये चाट मसाला,काळी मिरी पावडर आणि चवीनुसार मीठ टाकणे व ते नीट मिक्स करून घेणे

  3. 3

    नॉनस्टिक पॅनवर बटर घेऊन ते वितळले की त्यावर तयार केलेल्या मिश्रणातील अर्धे मिश्रण पसरावे. मग त्यावर किसलेले चीझ घालावे आणि वरती उरलेले अर्धे मिश्रण घालावे व झाकण ठेवावे.

  4. 4

    दोन्ही बाजूने आम्लेट खरपूस भाजून घ्यावे. स्पॅनिश आम्लेट खायला तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Vandana Shelar
Vandana Shelar @cook_26261725
रोजी
नवी मुंबई
Youtuber- Vandana's RecipeHome made RecipesFood Blogger
पुढे वाचा

टिप्पण्या (2)

Prachi Phadke Puranik
Prachi Phadke Puranik @cook_24245173_PP
Thank you ताई माझी रेसिपी कुकस्नॅप केल्याबद्दल 😊.
माझं नाव प्राची फडके पुराणिक आहे.

Similar Recipes