जत्रेतील जेवण वांग्याचे भरीत भाकरी (vangyach bharit recipe in marathi)

Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
मुंबई

#ks6
जत्रा महाराष्ट्रात नाही तर पूर्ण जगात भरते वेगवेगळ्या पद्धतीची जत्रा असते देवीदेवतांची आणि करमणुकीची जत्रा यात थोडा फरक असतो जत्रा म्हंटली की मला माझ्या लहानपणाची आठवण खूप मोठमोठे स्टॉल, वेगवेगळ्या खेळणी, खेळण्यांची दुकाने ,पाळणे भरपूर वस्तू विकणारे छोटे-मोठे दुकानदार येते डोळ्यासमोर पाहिलेली जत्रा आठवते आमच्या शहरात ही बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या जत्रा भरतात शहरापासून थोड्या अंतरावर चंदनपुरी इथंली खंडोबाची जत्रा, सप्तशृंगी देवीची जत्रा अशा बऱ्याच देवी-देवतांच्या जत्रा शहरात भरतात शहराच्या थोड्या अंतरावर अशा प्रकारच्या जत्रा भरतात गावागावातून लोक बैलगाड्या ट्रॅक्‍टर घेऊन पूर्ण कुटुंब परिवार सहित येतात आणि आपले बोललेले नवस पूर्ण करायला येतात पूर्वीच्या काळी या निमित्ताने देवी-देवतांच्या दर्शन आणि जत्रा हे करमणुकीचे साधन होते त्यामुळे अशा जत्रेतून कुटुंब पूर्ण
एकत्र येऊन जत्रेत जाऊन जेवण तयार करून देवाला नैवेद्य दाखवून दिवसभर करमणूक करून संध्याकाळी गावाकडे निघतात. जत्रेत जाताना बरोबर जेवणाचे सगळे साहित्य बनवून आणतात दगडी चूल मांडून पूर्ण जेवण तयार करतात आणि देवाला नैवेद्य दाखवून एकत्र जेवतात अशी बरीच प्रकारचे पदार्थ आहे जी जत्रेत ते लोक तयार करतात त्यात नॉनव्हेज हा प्रकारही आहे आणि व्हेज हा प्रकारही तयार केलेला प्रकार बऱ्याच जत्रांमध्ये लोक तयार करून एकत्र जेवतात भाकरी आणि वांग्याचे भरीत करायलाही सोपे जाते तिथे चूल मांडून वांगे शिकुन भरीत तयार केले जाते भाकरीबरोबर खाल्ले जाते अशा प्रकारच्या जत्रेत अशा प्रकारचे जेवण खायला गोड लागते.
रेसिपी तून नक्की बघूया वांग्याचे भरीत कशाप्रकारे तयार केले

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25 मिनिट
3 व्यक्ति
  1. 300 ग्रामभरिताची वांगी
  2. 2कांदे बारीक कट असलेले
  3. 1लसणाची गाठ सोलून बारीक कट केलेली
  4. 2-3हिरव्या मिरच्या कट केलेल्या
  5. 5-6कढीपत्त्याची पाने
  6. 1टोमॅटो कट केलेला
  7. 2 टेबल्स्पूनतेल फोडणीसाठी
  8. 1/4 टीस्पूनहिंग
  9. 1/2 टेबलस्पूनमोहरी जीरे
  10. प्रमाणे मसाले
  11. 1/2 टेबलस्पूनलाल मिरची पावडर,
  12. 1/2 टेबलस्पूनजिराधना पावडर,
  13. 1/2 टेबलस्पूनगरम मसाला,
  14. 1/2 टेबलस्पूनकाळा मसाला
  15. 1/2 टीस्पूनहळद
  16. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

25 मिनिट
  1. 1

    सर्वप्रथम वांगे धुऊन पुसून मधून थोडा कट करून आतून बघून घेऊ मग गॅस वर शेकून घेऊ

  2. 2

    शेकलेल्या वांग्याचे साल काढून वांगी कुस्करून घेउ
    मी देठ आणि साल ठेवणार आहे प्लेटिंग साठी त्याचा वापर करणार आहे

  3. 3

    आता फोडणीची तयारी करून घेऊ कढईत तेल तापवून मोहरी जीरे, हिंग,कढीपत्ता लसुन हिरव्या मिरच्या टाकून परतून घेउ

  4. 4

    कांदाही टाकून व्यवस्थित परतून घेऊ कांदा परतून झाल्यावर दिल्याप्रमाणे मसाले, मीठ टाकून परतून घेउ, टमाटे टाकून परतून घेऊ

  5. 5

    मसाले परतून झाल्यावर कुस्करलेले वा वांगे टाकून परतून घेऊन

  6. 6

    गॅस बंद करून देऊ तयार आपले वांग्याचे भरीत सर्व करताना कोथिंबीर टाकून घेऊ

  7. 7

    भरीत बरोबर बाजरीची भाकरी कांदा मिरची सर्व केली

  8. 8
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
रोजी
मुंबई
Cooking is an art which touches heart and lives across the globe with all mankind.Follow my page on Instagram_cuisine _culture _
पुढे वाचा

Similar Recipes