कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम बोनलेस चिकन घेऊन त्याची चौकोनी आकार कापून घ्यावे त्यानंतर आपल्याला त्याचे मॅरीनेशन तयार करायचा आहे त्यासाठी चिकन वरती आले लसूण पेस्ट तंदुरी मसाला लाल तिखट काश्मिरी लाल मिरची पावडर दही कसुरी मेथी व तेल टाकून मॅरीनेट करावे हे मरिनेशन कमीत कमी अर्धा तास ठेवावे
- 2
तर एका ग्रील पॅन मध्ये तेल टाकून हे चिकनचे पीस ग्रिल करून घ्या.
- 3
आता सर्व सुखी मसाले एकत्र करून त्याच्या मध्ये पाणी टाकून त्याची पेस्ट तयार करून घ्यावी त्यामध्ये कसुरी मेथी टाकून घ्यावी.
- 4
आता एका भांड्यामध्ये तेल गरम करून घ्या व त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकावा व तो गुलाबी रंगाचा होईपर्यंत भाजून घ्यावाा यामध्ये आपण जी मसालाची पेस्ट तयार केली आहे ती टाकून घ्यावी
- 5
जे आपण चिकन मॅरिनेट केलेले आहे त्याची उरलेली पेस्ट सुद्धा त्यामध्ये टाकावी त्या मसाल्याचा एक वेगळा फ्लेवर असतो त्या ग्रेव्हीला छान येतोसुटेपर्यंत परतून घ्यावे व त्यामध्ये आता आपल्याला टोमॅटोची प्युरी टाकायची आहे
- 6
चला कमीत कमी दहा मिनिट भाजावा जेणे करून त्याचं तेल सुटले पाहिजेआपल्याला फ्रेश क्रीम टाकून मिक्स करायचा आहे वरून कसूरी मेथी टाकावी.
- 7
तर त्यामध्ये चिकन टाकावे. व परतून घ्यावे
- 8
आपल्याला एक फोडणी तयार करायची आहे. एका भांड्यामध्ये बटर गरम करून घ्या त्यामध्ये लसुन गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्या त्यामध्ये हिरवी मिरची व सिमला मिरची टाकून घ्या. ती थोडीशी शिजवायची आहेत याचा कुरकुरीतपणा तसाच राहिला पाहिजे.
- 9
त्यानंतर ही फोडणी चिकन मध्ये टाकून घ्या व पाच मिनिटे वाफ काढा तयार रेस्टॉरंट स्टाईल चिकन टिक्का मसाला
Similar Recipes
More Recipes


























टिप्पण्या