माडगं (madaga recipe in marathi)

Pooja Katake Vyas
Pooja Katake Vyas @pooja_cookbook
Mumbai

#KS7
विसमरणात गेलेल्या रेसिपी या थीम मध्ये मी माझी आई करायची ते माडगं ही रेसिपी शेयर करत आहे. माडगं हे एक आयुर्वेदिक पेय किंवा सूप आधुनिक भाषेत म्हणता येईल, पूर्वी जुन्या काळी सूप ही संकल्पना न्हवती तेंव्हा पावसाळ्यात किंवा थंडीत लोक आजारी पडू नयेत ,सर्दी-खोकला होऊ नये म्हणून हे पेय प्यायचे, हे खूप औषधी व पौष्टिक असते .थोडक्यात पाऊस, थंडी बाधू नये म्हणून घरगुती औषध /पेय .
हे माडगं मी आज उडीद डाळीचं बनवलेलं आहे,पण काही ठिकाणी हे हुलग्याचे/कुळीथ चे बनवले जाते पण बनवण्यासाठी पध्दत तीच,काही जण हे माडगं लसूण-मिरची घालून थोडं तिखट देखील बनवतात.तर मग बघूयात माडगं कसं बनवायचे ते...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 वाटीउडीद डाळ
  2. 1/2 वाटीसेेंेंद्रिय गूळ
  3. 1 चमचातांदूळ/तांदळाची कणी
  4. 1/4 चमचावेलचीपूड
  5. 1/4 चमचामीठ
  6. 2 पेलापाणी

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    सर्व साहित्य एकत्र घ्या,मग एक कढई मध्ये मध्यम आचेवर उडीद डाळ भाजून घ्या,डाळ भाजून झाली की थंड झालेवर मिक्सरमध्ये बारीक करून घ्या,तांदूळ धुवून भिजवून घ्या

  2. 2

    मग कढई मध्ये 2 पेला पाणी गरम करा,पाणी गरम झाले की त्यात गूळ घाला,गूळ वितळून झाला की त्यात वेलचीपूड, मीठ घाला

  3. 3

    मग भिजवून ठेवलेले तांदूळ घाला व सगळं हलवुन एकजीव शिजवून घ्या,उडीद डाळ मिक्सरमध्ये बारीक करून घेतली ती वाटीमध्ये घेऊन पाणी घालून पेस्ट बनवून घ्या म्हणजे गुठळ्या होत नाहीत,मग ती पण कढई मध्ये घाला

  4. 4

    मग सगळं हलवुन 5-7 मिनिटे उकळू द्या,उकळल्यावर ते दाटसर होइल, मग तयार झाले आपले माडगे गरमागरम तूप घालून सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Pooja Katake Vyas
Pooja Katake Vyas @pooja_cookbook
रोजी
Mumbai

Similar Recipes