ढाबा वाली नागौरी दाल (dhaba wali nagori dal recipe in marathi)

Sapna Sawaji
Sapna Sawaji @sapanasawaji

#dr
डाळी शिवाय आपले जेवणच अपूर्ण आहेत रोजच्या जेवणात डाळ पाहिजेच डाळीत खूप
प्रोटीन्स आहेत.
आपल्याकडे विविध प्रकारच्या डाळी आहेत त्या आपण आपापल्या पद्धतीने करतो.
आज मी अशाच प्रकारची एक वेगळी डाळ केली ढाबा स्टाईल नागौरी डाळ.
भारत च्या राजस्थान राज्यात नागौर जिल्हा स्थित एक ऐतिहासिक शहर आहे. तिथली ही डाळ प्रसिद्ध आहे म्हणून याला नाव नागौरी डाळ.

ढाबा वाली नागौरी दाल (dhaba wali nagori dal recipe in marathi)

#dr
डाळी शिवाय आपले जेवणच अपूर्ण आहेत रोजच्या जेवणात डाळ पाहिजेच डाळीत खूप
प्रोटीन्स आहेत.
आपल्याकडे विविध प्रकारच्या डाळी आहेत त्या आपण आपापल्या पद्धतीने करतो.
आज मी अशाच प्रकारची एक वेगळी डाळ केली ढाबा स्टाईल नागौरी डाळ.
भारत च्या राजस्थान राज्यात नागौर जिल्हा स्थित एक ऐतिहासिक शहर आहे. तिथली ही डाळ प्रसिद्ध आहे म्हणून याला नाव नागौरी डाळ.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

तीस मिनिटे
पाच ते सहा
  1. 1/2 वाटीतुरीची डाळ
  2. 1/2 वाटीमसुरी डाळ
  3. 6-7 सुक्या लाल मिरच्या
  4. 5-6 लसणाच्या पाकळ्या बारीक कापलेल्या
  5. 1/2 इंचअद्रक बारीक कापलेले
  6. थोडा हिंग
  7. 2 चमचेतेल
  8. 1 टेबलस्पूनआमचूर पावडर
  9. 1 टेबलस्पूनकसूरी मेथी
  10. 1 टेबलस्पूनसोफ
  11. 1 टेबलस्पूनजीरा
  12. 1 टेबलस्पूनकश्मीरी लाल मिरची पावडर
  13. 1कांदा
  14. मीठ चवीनुसार
  15. 1/2 टेबलस्पूनहळद
  16. 1 टेबलस्पूनगरम मसाला
  17. 1 टेबलस्पूनधना जिरा पावडर

कुकिंग सूचना

तीस मिनिटे
  1. 1

    प्रथम अर्धी वाटी तुरीची डाळ अर्धी वाटी मसूर डाळ एकत्र करूनघेणे

  2. 2

    दोन्ही डाळी एकत्र कुकर मध्ये टाकून स्वच्छ धुऊन घेणे व कुकरला लावून तीन शिट्ट्या करून घेणे

  3. 3

    कुकर मध्ये डाळ शिजवून घेतली

  4. 4

    कांदा बारीक चिरून घ्यावा नंतर एक कढाई ठेवून त्यात दोन चमचे तेल घालावे त्यात एक चमचा जिरा व एक चमचा सोफ घालून घ्यावी

  5. 5

    जीरे व सोफ तडतडले की त्यात लसणाचे बारीक तुकडे अद्रकाचे बारीक तुकडे व लाल मिरच्या घालून घ्याव्या

  6. 6

    आता या फोडणीतील थोडे तेल मिरची सर्वच बाजूला काढून घ्यावे नंतर तडका देण्यासाठी हि फोडणी कामी येते

  7. 7

    आता उरलेल्या कढईतील तेलात बारीक चिरलेला कांदा घालावा कांदा छान गुलाबी सर होऊ द्यावा कांदा छान झाला की त्यात सर्व मसाले टाकून घेणे कसुरी मेथी, आमचूर पावडर घालून घ्यावी

  8. 8

    नंतर त्यात आपण शिजवलेले वरण घालून घ्यावे त्यात चवीप्रमाणे मीठ घालावे

  9. 9

    पाच मिनिटे शिजू द्यावे

  10. 10

    नंतर सर्व्ह करायचे त्या पॉटमध्ये काढून वरतून जो आपण तडका (तेल) काढला तो डाळीवर टाकावा

  11. 11

    वरतून कोथिंबीर घालुन धाबा स्टाइल नागौरी दाल सर्व्ह करावी

  12. 12

    मस्त गरमागरम भात किंवा पोळी सोबत खायला द्यावी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sapna Sawaji
Sapna Sawaji @sapanasawaji
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes