व्हॅनिला कपकेक्स (Vanilla Cupcakes recipe in marathi)

Pallavi Gogte
Pallavi Gogte @Pallavi08

मुलांच्या विशेष आवडीची पाककृती
#AsahiKaseiIndia

व्हॅनिला कपकेक्स (Vanilla Cupcakes recipe in marathi)

मुलांच्या विशेष आवडीची पाककृती
#AsahiKaseiIndia

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
साधारणपणे 6 सर्व्हिंग्ज
  1. 1.5 वाटीमैदा किंवा गहूपीठ
  2. 1/2 वाटीसाखर
  3. 1.5 टीस्पूनबेकिंग पावडर
  4. 1/2 टीस्पूनबेकिंग सोडा
  5. 5 टेबलस्पूनमिल्कपावडर
  6. 1 वाटीदूध
  7. 1.5 टीस्पूनव्हिनेगर
  8. 1/4 वाटीघरचे पातळ तूप (ऐच्छिक)
  9. व्हॅनिला एस्सेन्स
  10. चिरलेले काजू बदाम

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    प्रथम तुमचा ओव्हन प्रिहीट करावा, 180℃ वर. सर्व साहित्य सामान्य तापमानाचे असावे. मग व्हिनेगर दुधामध्ये मिसळा. दुसऱ्या बाउल मध्ये साखर, तूप नीट मिक्स करा. मग त्यात दूध व दूध पावडर घालावी. परत नीट मिक्स करावे. आता त्यात मैदा किंवा गहू पीठ घालावे. परत नीट मिक्स करावे. खूप जास्त पण फेटू नका आता त्यात बेकिंग पावडर, बेकिंग सोडा व व्हॅनिला एस्सेन्स घालावा. मिश्रण चांगले एकजीव करावे.

  2. 2

    आता कपलायनर्स घ्यावेत आणि त्यात हे मिश्रण 2/3 (दोन तृतीयांश) कप भरेल एवढे घालावे. वरून काजू बदाम घालावेत. आता ओव्हनमध्ये खालच्या रॉड वर 160℃ ते 180℃ वर 15-20 मिनिटे ठेवावे. कपकेक्स रेडी!

  3. 3

    कूकरमध्ये करायचा असेल तर कूकरची गास्केट
    काढून टाका आणि आतमध्ये पाणी, मीठ काही टाकू नका. कमी गॅसवर कुकर ठेवून द्यावा. मिश्रण तयार झाले की एका भांड्यात भरलेले कपलायनरस् ठेवून ते कूकरमध्ये ठेवावेत. हे पण साधारण 15 ते 20 मिनिटांमध्ये तयार होतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pallavi Gogte
Pallavi Gogte @Pallavi08
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes