बटाटा-भेंडी भाजी (Batata bhendi bhaji recipe in marathi)

Aneeta Kindlekar
Aneeta Kindlekar @Anita_Kindlekar99
Ahmednagar

अगदी झटपट होणारी रेसिपी म्हणजे भेंडी-बटाटा भाजी. बटाटा तळून घेतल्यामुळे आणि पूर्णतः वाफेवर शिजवल्यामुळे भाजी खाताना कुरकुरीतपणा जाणवतो.

बटाटा-भेंडी भाजी (Batata bhendi bhaji recipe in marathi)

अगदी झटपट होणारी रेसिपी म्हणजे भेंडी-बटाटा भाजी. बटाटा तळून घेतल्यामुळे आणि पूर्णतः वाफेवर शिजवल्यामुळे भाजी खाताना कुरकुरीतपणा जाणवतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

अर्धा तास
४ जणांसाठी
  1. 1/4 किलोभेंडी
  2. 4मध्यम आकाराचे थोडे वाफवलेले बटाटे
  3. 2कांदे
  4. 2 ते ३ आमसुले
  5. 1/2 चमचाहिंग
  6. 1 चमचालाल तिखट
  7. 1/2 चमचाजीरे
  8. 1/2 चमचामोहरी
  9. 1/2 चमचाहळद
  10. 1/2 चमचागोडा मसाला
  11. 4 ते ५ चमचे तेल

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    भेंडी धुवून आणि पुसून छान बारीक चिरून घ्या. उकडलेले बटाटे चिरून घ्या. कांदा बारीक चिरून घ्या.

  2. 2

    चिरलेल्या बटाट्यात लाल तिखट आणि थोडं मीठ घाला. आता गॅसवर कढई ठेवून त्यात २ चमचे तेल घाला. आता त्यात लाल तिखट मिक्स केलेला चिरलेला बटाटा घाला. तेलावर बटाटा परतून घेतला म्हणजे तो फुटत नाही. तो एका भांढ्यात काढून बाजूला ठेवून द्या.

  3. 3

    आता एका कढईच दोन चमचे तेल घालून मोहरी, जीरे, हिंग आणि आमचुर घाला. गॅस मंद आचेवर ठेवा आणि परतून घ्या. कांदा थोडा लालसर झाला की त्यात चिरलेली भेंडी घाला आणि छान परतून घ्या.

  4. 4

    भेंडी छान पातळ चिरल्यामुळे अवघ्या पंधरा मिनीटात शिजते. गॅस मंद आचेवर ठेवा आणि मधून मधून चमच्याने परतायला विसरु नका.

  5. 5

    आता त्यात तेलावर परतेलेला बटाटा, लाल तिखट, जीरे पूड, हिंग आणि गोडा मसाला आणि चवीनुसार मीठ घाला आणि परतून घ्या.

  6. 6

    पाच ते सात मिनीटे भाजी शिजू द्या म्हणजे मसाले भाजीत एकजीव होतात.

  7. 7

    आता गॅस बंद करा आणि मस्त मसालेदार भेंडी-बटाटा भाजी तयार आहे. पोळी किंवा भाकरीबरोबर ही भाजी छान लागते.तळलेला बटाटा घातल्यामुळे तिची चव एकदम भारी आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Aneeta Kindlekar
Aneeta Kindlekar @Anita_Kindlekar99
रोजी
Ahmednagar
मस्त खा, स्वस्थ राहा !!
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes