मिक्स डाळींची खिचडी (mix dal khichdi recipe in marathi)

सुप्रिया घुडे
सुप्रिया घुडे @cook_SupriyaGhude97
वसई

मिक्स डाळींची खिचडी (mix dal khichdi recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

पाऊण तास
३ व्यक्तींसाठी
  1. 1 वाटीतांदूळ
  2. 1 वाटी मिक्स डाळी - तूर, मूग, मसूर
  3. मीठ चवीपुरते
  4. पाणी (आवश्यकतेनुसार - शिजवण्यासाठी)
  5. 1कांदा
  6. 2हिरवी तिखट मिरच्या
  7. फोडणी
  8. 2पळी तेल
  9. चिमूटभरहिंग
  10. 4-5कढीपत्ता पाने
  11. 1 चमचाजीरे
  12. 1 चमचामोहरी
  13. 2लाल सुक्या - बेडगी मिरच्या
  14. 1/2 चमचामोहरी
  15. 1 चमचागोडा मसाला
  16. 1 चमचामसाले भात मसाला (ऐच्छिक)
  17. 1 चमचाजीरे पावडर
  18. 1 चमचाधणे पावडर
  19. 1/2 वाटीकोथिंबीर

कुकिंग सूचना

पाऊण तास
  1. 1

    १ वाटी तांदूळ आणि १ वाटी - मिक्स डाळी - तूर, मूग, मसूर स्वछ धुवून पाणी काढून निथळत ठेवले.
    १ कांदा, २ हिरवी तिखट मिरच्या, कोथिंबीर बारीक चिरून ठेवले.
    कुकर मध्ये २ पळी तेल गरम करून त्यात ४-५ कढीपत्ता पाने, चिमूटभर हिंग, १ चमचा जीरे, १ चमचा मोहरी, २ लाल सुक्या - बेडगी मिरच्या, अर्धा चमचा मोहरी ची फोडणी दिली. फोडणीचा घमघमाट पसरला कि त्यात १ चमचा गोडा मसाला, १ चमचा मसाले भात मसाला, १ चमचा जीरे पावडर, १ चमचा धणे पावडर घालून फोडणीवर परतले.

  2. 2

    मसाल्यांचा सुगंध पसरला कि त्यात निथळलेले तांदूळ आणि डाळी घालून फोडणीवर खमंग परतून घेतले. मग त्यात नेहमी भात करताना पाणी घालतो तेवढं पाणी घालून कुकर ला ३ शिट्या काढल्या.

  3. 3

    निमरल्यावर खिचडीत अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर मिक्स करून खिचडी सर्व्ह केली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
सुप्रिया घुडे
रोजी
वसई
🇮🇳👰Independent Women👩🏻‍💻Software Programmer👯Traveller👸Explorer👰Foodie👱Artist📖Book Lover / Reader📝Lifetime Learner🇮🇳
पुढे वाचा

Similar Recipes