ॲपल रबडी (apple rabdi recipe in marathi)

Nilesh Hire
Nilesh Hire @cook_26025116

#rbr
रक्षाबंधन स्पेशल ॲपल रबडीचा बेत म्हणजे आमच्या घरातील बच्चे कंपनी एकदम खूष. ॲपल हे शरीरासाठी फारच उत्तम फळ आहे. पण लहान मुले ते खायला कंटाळा करतात. मग अशा सणावाराला हा ॲपल रबडी चा बेत आखुन मुलांना करा की खूष....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25 मिनिटे
4 जणांसाठी
  1. 4सफरचंद
  2. 1 लिटरदूध
  3. 5-6 टेबलस्पून साखर
  4. 2 टेबलस्पूनसुकामेवा
  5. 1 टीस्पूनवेलची पावडर
  6. 2-3केसर काड्या

कुकिंग सूचना

25 मिनिटे
  1. 1

    प्रथम दूध तापवून ते आटवून घ्यावे. त्यामध्ये साखर घालावी व त्याची रबडी बनवून घ्यावी

  2. 2

    नंतर सफरचंद घेऊन ते किसून घ्यावे

  3. 3

    वरील रबडी मध्ये सफरचंदाचा किस घालावा. तसेच सुकामेवा पण घालावा.

  4. 4

    वरील मिश्रण 1 मिनिटभर गरम करावे त्यामध्ये केसर व वेलची पावडर घालावी. व गॅस बंद करावा

  5. 5

    आता तयार झालेली ही ऍपल रबडी एका ग्लास मध्ये ओतून घ्यावी... पाहिजे असल्यास फ्रिज मध्ये ठेवून थंड करून खावी...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Nilesh Hire
Nilesh Hire @cook_26025116
रोजी

Similar Recipes