भोगीघी भाजी (bhogi bhaji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
आपल्या कडे उपलब्ध असलेल्या सगळ्या शेंगांचे दाणे काढून घ्यावे. वाल पापडीच्या शेंगाचे तुकडे करुन घ्यावे. वांगी, बटाटे चिरुन फोडी करून पाण्यात भिजत ठेवायच्या म्हणजे फोडी काळ्या पडत नाहीत.
- 2
तिळ आणि शेंगदाणे भाजून त्याचे कुट करुन घ्यावे.
- 3
कुकर मधे तेल घालून त्यात फोडणीसाठी मोहरी, जीरे घालून तडतडल्यावर त्यात चिरलेल्या भाज्या आणि शेंगांचे दाणे घालून परतून त्यावर तिखट पूड, हळद, धणे जीरे पावडर, गरम मसाला पावडर, गोडा मसाला. चिंचेचा कोळ, गूळ आणि मीठ घालून मिक्स करावे. मग पाणी घालून भोगीची भाजी शिजवून घ्यावी.
- 4
गरमागरम भोगीच्या भाजीवर ओलं खोबरं, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि भाजलेले तीळ घालून मस्त चमचमीत भोगीची भाजी सर्व्ह करावी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
भोगीची लेकुरवाळी भाजी (Bhogichi Bhaji Recipe In Marathi)
#TGR#मकरसंक्रांती_स्पेसल_रेसिपीसमकरसंक्रांतीच्या आसपास शेतामधे अगदी लहान लहान कोवळ्या भाज्या यायला लागतात. लहान लेकरांसारख्या दिसणार्या कोवळ्या भाज्या खूप छान दिसतात. म्हणून या भाजीला लेकुरवाळी भाजी असं पण म्हणतात. लहान लहान वांगी, बटाटे, ओला वाटाणा, ओला हरभरा, पावटा, गुलाबी रंगाची गाजरं अशा अनेक प्रकारच्या ताज्या भाज्या एकत्र शिजवून त्यात जरासे मीठ मसाले घालून केलेल्या भाजीची चव अगदी अफलातून लागते. आपल्या कडे उपलब्ध असलेल्या भाज्या घालून भोगीची भाजी करावी. ही भाजी करायला अगदी सोपी आहे. भाजी बनवायला पण जास्त वेळ लागत नाही, शिवाय कोवळ्या भाज्या असल्यामुळे पटकन शिजते. या भाजीची सविस्तर रेसिपी पुढे स्टेप बाय स्टेप देत आहे. Ujwala Rangnekar -
-
-
पावट्याच्या शेंगांची मिक्स भाजी (Pavtachya Shenganganchi Recipe In Marathi)
#LCM1#पावट्याच्या_शेंगांची_मिक्स_भाजी Ujwala Rangnekar -
-
-
उकडहंडी/ उकरांडी/ संक्रांतीची वाडवळी पद्धतीची मिक्स भाजी (ukadhandi mix bhaji recipe in marathi)
#EB9#W9 Komal Jayadeep Save -
भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi)
#EB9#W9#मकर_संक्रांति_स्पेशल#भोगी_भाजी Jyotshna Vishal Khadatkar -
-
-
-
-
भोगीची मिक्स भाजी (bhogichi mix bhaji recipe in marathi)
#EB9#W9जानेवारी महिन्यामध्ये प्रत्येक वर्षी 14 जानेवारीला संक्रात येते त्याच्या आदल्या दिवशी भोगी चा सण साजरा करतात या दिवशी मिक्स भाजी मिक्स भाज्या तिळकूट घालून बनवली जाते याबरोबर तीळ लावलेली बाजरीची भाकरी खातात Smita Kiran Patil -
-
भोगीची भाजी (संक्रांति स्पेशल) (bhogichi bhaji recipe in marathi)
#मकर संक्रांति रेसिपी ही भाजी मला इतकी आवडली की मी तुम्हाला सांगितल्याशिवाय राहू शकले नाही सुपर Najnin Khan -
-
भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi)
#EB9#W9#विंटर रेसिपी चॅलेंज मकर संक्रांत स्पेशल विंटर रेसिपी चॅलेंज Week-9 कांदा व लसुन विरहित तयार केलेली भोगीची सात्विक भाजी Sushma pedgaonkar -
भोगीची भाजी (bhogi chi bhaji recipe in marathi)
#मकर#भोगीचीभाजी#mixveg#मिक्सवेज आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे आपले जनजीवन हे सगळे शेतात होणाऱ्या फळ, भाज्या धान्य यांवर अवलंबून आहे. जेवढी राज्य तेवढे प्रकार तेवढी खाण्यापिण्याची संस्कृती प्रकार सगळीकडे एकच ज्या ज्या राज्याच्या भागात जे काही उगवते, पेरते तेच खाद्य पदार्थ रोजच्या आहारात समावेश होतात. भोगी, संक्रांत कॅलेंडर प्रमाणे वर्षाचा पहिला सण भोगी संक्रांत, सण आणि त्याचा साजरा करण्याची पद्धत जरी वेगळी असली तरी हा मोठ्या उत्साहाने भारताच्या प्रत्येक राज्यातून साजरा केला जातो, कोणी पोंगल कोणी बिहू कोणी लोहरी कोणी उत्तरायण ही सगळी एकाच सणाची नावे आहे की वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या राज्यात साजरी केली जातात , ज्या ज्या राज्यात जी फळ धाने कडधान्य हिवाळ्यात पीक म्हणून येतात ते सगळे आहारात समावेश करतात, महाराष्ट्रात भोगीची भाजीही भोगीच्या दिवशी बनविले जाते, सगळ्या प्रकारची धान्ये भाज्या शेंगा सगळे प्रकार टाकले जातात, हाच प्रकार बाकीच्या राज्यांमध्येही बनवला जातो त्यांची नावे वेगळी असतात कोणी अवियल म्हणतात तर उंधियो, कोणी शुकतो ही सगळी मिक्स भाज्यची नावे आहे बनवण्याची पद्धत आणि घटक वेगळे असतात पण संक्रांतीच्या वेळेस हे बनविले जातात नववर्षाच्या पहिला सण सगळीकडे उत्साहाने साजरा केला जातो,भोगीची भाजी भोगी या नावातच तिचा अर्थ दडलेला आहे, भोग म्हणजे नैवेद्य देवाला आपण अर्पण करतो तिळाचे फोडणी देऊन ही भाजी बनवली जाते बऱ्याच प्रकारच्या भाज्या वापरल्या जातात वेगवेगळ्या प्रकारच्या फोडणी देऊन ही भाजी बनवली जाते. आपल्या आवडीनुसार भाज्यांचे प्रमाण कमी जास्त करता येते, थोड्या-थोड्या भाज्या करून ही भरपूर प्रमाणात ही भाजी तयार होते, या भाजीला 'लेकुरवाळी 'भाजी ही म्हणतात Chetana Bhojak -
-
-
भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi)
#EB9 #W9E-book विंटर स्पेशल रेसिपीजमकरसंक्रातिच्या आदल्या दिवशी म्हणजे भोगीच्या दिवशी पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे सातारा भागात वेगवेगळ्या भाज्या मिक्स करून "भोगीची भाजी" ज्याप्रमाणे बनविली जाते त्याप्रमाणे बनविली आहे. नक्कीच तुम्हाला आवडेल.🥰 Manisha Satish Dubal -
भोगिची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi)
#letpost#bhogibhajiभोगिची भाजी वेगवेगळ्या प्रांतात तेथील हिवाळ्यात मिळणाय्रा भाज्या घालून बनवली जाते. पारंपारिक भाजीत 13 किंवा त्यापेक्षा जास्त भाज्या घातल्या जातात.तसेच काही ठिकाणी कांदा लसूण घालतात पण नैवद्याला कांदा लसूण काही ठीकाणी चालत नाही.मसालेही उपलथ्दते नूसार वापरून ही रेसेपि बनवली जाते. Jyoti Chandratre -
-
-
भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi)
#मकरनवीन वर्षाच्या सुरुवातीला पहिला सण भोगी.भोगीची भाजी छान लागते मिक्स भाज्या. हिवाळ्यात भरपूर भाज्या येतात.चला तर मग करूया भोगीची भाजी. Shilpa Ravindra Kulkarni -
भरलं वांग (bharla wanga recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2गावाची आठवणसांगली जिल्ह्यातील इस्लामपूर हे माझं आजोळ आहे. तिथे मी आजी-आजोबांच्या बरोबर लहानपणी रहात होते. तिकडे आठवड्याचा बाजार भरत असे. मला आज्जी बरोबर त्या बाजारात जायला फार आवडे. तिकडे वेगवेगळ्या प्रकारचे धान्य, भाजीपाला, खाऊ असे मिळत होते. तिथे दूधाचा आईस्क्रीम गोळा त्यावेळी १० पैशाला मिळायचा तो मिळावा म्हणून मी आज्जी बरोबर जायला तयार होत असे. सगळा बाजारहाट खरेदी करुन झाल्यावर आज्जी मला तो आईस्क्रीम गोळा विकत घेऊन देई. कधी कधी तर दोन दोन आईस्क्रीम गोळे देत असे. त्यानंतर घरी आल्यावर आज्जी विचारायची की आज आणलेल्या भाजी मधली कोणती भाजी करु. खरं तर आज्जीला माझं उत्तर माहित असायचं. आणि मी चटकन सांगायची की आज भरलं वांग कर. मला खूप आवडतं. मग आज्जी माझ्या साठी भरलं वांग बनवायची. इतकं अप्रतिम टेस्ट होती तिच्या हाताला. आजही आज्जीच्या हातची चव तोंडात आहे. तिच्या बरोबर राहून तिला हवे तशी मदत करताना मी शिकून घेतलेल्या भरल्या वांग्याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
तिळाची चटणी (तिळकूट) (tilachi chutney recipe in marathi)
ही पारंपरिक चटणी करणारी माझी ४थी पिढी.#मकरCharita
-
भोगीची भाजी (bhogi chi bhaji recipe in marathi)
#मकर#मकर संक्रांत स्पेशल भोगीची भाजीमकर संक्रांतीचा आदला दिवस म्हणजे भोगी. या दिवशी सर्व भाज्या, शेंगा, वांगी घालून भोगीची भाजी बनवली जाते. ही भाजी बाजरीची तीळ लावून केलेली भाकरीबरोबर खाल्ली जाते. Deepa Gad -
भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi)
#मकर जानेवारी महिन्यात ज्या ज्या भाज्या, पिके उपलब्ध असतात, त्या सर्वांची मिळून एक भाजी तयार केली जाते. त्यामध्ये आवर्जून तीळ कुटून टाकले जातात. सर्व भाज्या एकत्र करून बनवलेली भाजी ही या दिवशी बाजरीच्या भाकरीबरोबर खाल्ली जाते. त्यामध्ये चाकवत, वांगे, बोर, गाजर, ओला हरभरा, घेवड्याच्या शेंगा अशा भाज्यांचा समावेश असतो.हा काळ थंडीचा असल्याने शरीरात अतिरिक्त ऊर्जेची गरज भासत असते. म्हणून बाजरी आणि तीळ हे दोन्ही घटक उष्ण असल्याने त्यांचा आहारात समावेश केला जातो. Prachi Phadke Puranik -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15887448
टिप्पण्या (2)