घेवड्याची भाजी (ghevdyachi bhaji recipe in marathi)

Smita Kiran Patil
Smita Kiran Patil @myrecipe_2249
Sanpada Navi Mumbai

#ccs
दत्तगुरूंची आवडती भाजी
दत्तगुरुंना घेवड्याच्या भाजीचा नैवेद्य दाखवला जातो. गुरुचरित्राचे पारायण करताना शेवटच्या दिवशी किंवा प्रथम दिवशी सुद्धा घेवड्याच्या भाजी चा नैवेद्य दाखवला जातो घेवड्याच्या भाजी बाबतची एक कथा गुरुचरित्र अध्याय मध्ये आहे. नरसिंह सरस्वती सकाळच्या प्रहरी गावातून भिक्षा मागत असताना एका ब्राह्मणाच्या घरी येतात तो खूपच गरीब असतो त्याच्याकडे द्यायला काहीच नसते तेव्हा त्याची बायको त्यांच्या दारात असलेल्या घेवड्याच्या वेला च्या शेंगा काढून दत्तगुरुंना देते . दत्त महाराज हा वेल छाटून टाकतात. आणि त्या ब्राह्मणाला त्या वेलाखाली खोदायला सांगतात तेव्हा त्या ब्राह्मणाला जमिनीमध्ये धन सापडते अशी कथा गुरुचरित्र अध्याय मध्ये आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

वीस मिनिटं
चार लोकांसाठी
  1. 1/4 किलोघेवड्याच्या शेंगा
  2. 2 चमचेदाण्याचा कूट
  3. 1.5 चमचा तिखट
  4. हळद
  5. फोडणीसाठी जीरे मोहरी
  6. कोथिंबीर
  7. 1कांदा अर्धा टोमॅटो नैवेद्य साठी करत असाल तर लसून कांदा वापरू नये

कुकिंग सूचना

वीस मिनिटं
  1. 1

    प्रथम घेवड्याच्या शेंगांच्या शिरा काढून या शेंगा मोडून घ्याव्यात किंवा सुरीने कट कराव्यात

  2. 2

    कढईत तेल तापत ठेवावे जीरे मोहरी ची फोडणी करावी कांदा टोमॅटो परतून घ्यावा कट केलेल्या घेवड्याच्या शेंगा घालून परताव्यात

  3. 3

    शेंगा परतल्यानंतर यामध्ये लाल तिखट मीठ दाण्याचा कूट घालून परतावे झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यावी चवीप्रमाणे मीठ घालावं

  4. 4

    पाच ते सात मिनिटात ही भाजी शिजते झाकण उघडून बघावे वरून कोथिंबीर घालुन भाकरी किंवा चपाती बरोबर सर्व्ह करावे

  5. 5
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Smita Kiran Patil
Smita Kiran Patil @myrecipe_2249
रोजी
Sanpada Navi Mumbai

Similar Recipes