भाजनीची खमंग कुरकुरीत चकली(Bhajanichi chakali recipe in marathi)

Ashwini Fartade
Ashwini Fartade @cook_30604082

दिवाळी स्पेशल फराळ...... दिवाळीचा फराळ तर आपण दर वर्षी करतोच पण या वर्षी कूकपॅड टीम ने दिवाळी फराळ चॅलेंज ठेवून फराळ बनवायला प्रेरित केले आहे.. #dfr

भाजनीची खमंग कुरकुरीत चकली(Bhajanichi chakali recipe in marathi)

दिवाळी स्पेशल फराळ...... दिवाळीचा फराळ तर आपण दर वर्षी करतोच पण या वर्षी कूकपॅड टीम ने दिवाळी फराळ चॅलेंज ठेवून फराळ बनवायला प्रेरित केले आहे.. #dfr

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२तास
अधिक
  1. ४ वाटी तांदूळ
  2. २ वाटी हरभरा डाळ
  3. 1 वाटीमूग डाळ
  4. 1/2 वाटी उडीत डाळ
  5. 1 वाटी पोहे
  6. 1/2 शाबुदाना
  7. 2 टेबलस्पुन धने
  8. 2 टेबलस्पुन जीरे
  9. 2-3 टेबलस्पून तीळ
  10. 2 टेबलस्पूनतेल
  11. 1 टेबलस्पूनओवा
  12. चवीप्रमाणे मीठ

कुकिंग सूचना

२तास
  1. 1

    तांदूळ,आणि सर्व डाळी स्वच्छ धुऊन घ्याव्यात. नंतर त्या एका कपड्यावर वाळत घालाव्यात.

  2. 2

    तांदूळ,डाळी वाळल्यावर एका कढईत सर्व एक-एक घटक हलक्याशा भाजून घ्यावेत.

  3. 3

    भाजलेले सर्व पदार्थ एकत्र करून जाडसर दळून आणावेत.

  4. 4

    भाजणीचे तयार झालेले पीठ मोजून घ्यावे. समजा आपण दोन वाटी पीठ घेतले आहे. पीठ एका मोठ्या भांड्यात घ्यावे आणि त्यात मीठ,तीळ,हळद,लाल मिरची पावडर, ओवा मिक्स करावे.

  5. 5

    एका मोठे पातेले गॅसवर ठेवून त्यात तेल टाकावे.जो वाटी आपण पीठ मोजून घेण्यासाठी घेतला आहे त्यात बाऊलने आपण १बाऊल म्हणजे पिठापेक्षा अर्धे पाणी पातेल्यात टाकावे.

  6. 6

    पाण्याला उकळी आल्यावर गॅस बारीक करुन त्यात थोडे थोडे पीठ घालून मिक्स करावे.

  7. 7

    पीठ अर्धे ओले राहते.नंतर गॅस बंद करून पातेल्यावर झाकण ठेऊन ते अर्धा तास तसेच ठेवावे.

  8. 8

    अर्ध्या तासाने पीठ एका मोठ्या ताटात घ्यावे.आणि थोडा थोडा पाण्याचा हात घेऊन ते एकजीव करून घ्यावे.

  9. 9

    सोऱ्याच्या साह्याने छान चकल्या करून घ्याव्यात. नंतर तेल गरम करून कढईत मंद आचेवर तळव्यात.

  10. 10

    मस्त कुरकुरीत चकली तयार.....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ashwini Fartade
Ashwini Fartade @cook_30604082
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes