खारे वांगे (Khare Vange Recipe In Marathi)

Supriya Devkar
Supriya Devkar @cook_1983
Solapur

#BWR वांग्याची आपण अनेक प्रकार पाहतो त्यातल्या हिरव्या वांग्याची चव ही खूप छान असते आणि म्हणूनच आज आपण हिरव्या वांग्याचे खारे वांगे बनवणार आहोत

खारे वांगे (Khare Vange Recipe In Marathi)

#BWR वांग्याची आपण अनेक प्रकार पाहतो त्यातल्या हिरव्या वांग्याची चव ही खूप छान असते आणि म्हणूनच आज आपण हिरव्या वांग्याचे खारे वांगे बनवणार आहोत

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25 मिनिट
दोन वाटी
  1. 4हिरवी वांगी मध्यम आकाराची
  2. 1/2 वाटीसुक्या खोबऱ्याचा कीस
  3. 7 ते आठ लसूण पाकळ्या
  4. 2 ते तीन हिरव्या मिरच्या
  5. 1/2 वाटीकोथिंबीर
  6. मीठ चवीनुसार
  7. 2 ते तीन टेबलस्पून शेंगदाण्याचं कूट
  8. 1 टेबलस्पूनधने जीरे पूड
  9. 1/2 टीस्पूनजीरे फोडणी करता
  10. 2 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

25 मिनिट
  1. 1

    सर्वप्रथम खोबरे लसूण आलं मिरची कोथिंबीर ही सर्वांचे एक बारीक वाटण तयार करून घ्यावे

  2. 2

    वांग्याच्या फोडी किंवा अख्खे वांगी चिरून घ्यावे. त्यानंतर कढईत तेल गरम करावे आणि त्यात जीरे मोहरीची फोडणी द्यावी त्यानंतर तयार केलेले हिरवे वाटण घालावे

  3. 3

    याच वाटणात शेंगदाण्याचे कूट आणि चवीपुरते मीठ घालून सर्व मसाला छान परतून घ्यावा थोडे पाणी घालावे जेणेकरून मसाला छान शिजेल त्यानंतर त्यात चिरलेल्या वांग्याचे फोडी घालाव्यात नंतर वरून धने जीरे पूड घालून घ्यावी

  4. 4

    आता वांगी शिजण्यास आवश्यक तेवढेच पाणी त्यात घालावे आणि उकळी आल्यानंतर झाकण ठेवून वांगे शिजू द्यावे जास्त पातळ असू नये ही वांग्याची भाजी आपण चपाती भाकरी सोबत किंवा भात सोबत खाऊ शकतो

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Supriya Devkar
Supriya Devkar @cook_1983
रोजी
Solapur
cooking is my hobby. I like to cook new dishes. I like to innovate recipes.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes