वरण फळं (varan fal recipe in marathi)

Shital Muranjan
Shital Muranjan @shitals_delicacies

#HLR
ब्रेकफास्ट साठी किंवा डिनरसाठी छान सात्विक प्रकार वरण फळं..नक्की करून पहा.

वरण फळं (varan fal recipe in marathi)

#HLR
ब्रेकफास्ट साठी किंवा डिनरसाठी छान सात्विक प्रकार वरण फळं..नक्की करून पहा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

35 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. उकड साठी :
  2. 2 कपमोदकाचे पीठ/ तांदूळ पीठ
  3. 1.5 कप पाणी
  4. 2 टीस्पूनतूप
  5. 2 टीस्पूनदूध
  6. 1/2 टेबलस्पूनमीठ
  7. गोडं वरण
  8. 1 वाटीतुरीची डाळ
  9. फोडणीसाठी साहित्य-
  10. 1 टेबलस्पूनतूप
  11. 1 टीस्पूनजीरं
  12. 1 टीस्पूनहळद
  13. 7-8कढीपत्त्याची पाने
  14. 2 चिमुटभरहिंग
  15. आवडीनुसार कोथंबीर
  16. 2 टेबलस्पूनओलं खोबरं
  17. 1 टीस्पूनसाखर
  18. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

35 मिनिटे
  1. 1

    सुरुवातीला आपण उकड काढून घेऊ. त्यासाठी पातेले किंवा कढई गॅसवर ठेवा. त्यामध्ये पाणी गरम करत ठेवा. पाण्यात मीठ, तूप व दूध घाला.
    पाण्याला उकळी आली की गॅस बंद करा. ह्यामध्ये तांदळाचे पीठ घाला आणि पटपट मिक्स करून घ्या. भांड्यावर घट्ट झाकण घाला. कमीत कमी पंधरा मिनिट तरी पीठ झाकून ठेवा.

  2. 2

    आता पीठ एका परातीत घेऊन उकड थोडी गरम असताना मळायला सुरुवात करा. तेल पाण्याचा हात लावून उकड मऊ मळून घ्या. जेवढा जास्त वेळ उकड मळून घ्याल तेवढं पीठ छान तयार होईल. छोट्या लिंबाच्या आकाराचा पिठाचा गोळा घ्या आणि बोटाने दाबून-दाबून वाटीचा आकार द्यावा.

  3. 3

    मोदक पात्रात पाणी गरम करावयास ठेवावे
    ज्या चाळणी मध्ये तांदळाच्या वाट्या उकडणार आहोत त्याला तेल लावून घ्या आणि एकेक करून तांदळाच्या ह्या बनविलेल्या वाट्या ठेवून द्या. पंधरा मिनिटे छान वाफवून घ्यावे. थोडे थंड झाले की सर्व तांदळाच्या वाट्या एका डब्यामध्ये मध्ये काढून घ्या.

  4. 4

    तुरीची डाळ स्वच्छ धुऊन कुकरला शिजवून घ्यावी. तीन शिट्या कराव्यात.

  5. 5

    एका पातेल्यात तूप गरम करून त्यामध्ये जीरे टाकावे. जिरं तडतडलं कि त्यामध्ये कढीपत्ता व हळद घालावी. डाळ थोडी व्यवस्थित सारखी करून तिला फोडणी मध्ये घालावी.
    साखर व मीठ चवीनुसार घालावे. कोथंबीर व खोबरं घाला. त्यानंतर चांगली उकळी येऊ द्यावी. गरम गरम सर्व्ह करावे.

  6. 6

    मस्त लुसलुशीत वाफवलेल्या तांदळाची फळं वरणासोबत व तुपाबरोबर सर्व्ह कराव्यात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shital Muranjan
Shital Muranjan @shitals_delicacies
रोजी
Follow to learn Awesome Delicacies to bring sweetness to your life n your loved ones|Homebaker|Author|foodblogger|Creative||vegetarian| |Food Photography | |Love for Cooking baking|
पुढे वाचा

टिप्पण्या (2)

Similar Recipes