चिझी बाईट्स (cheese bites recipe in marathi)

Pragati Hakim
Pragati Hakim @cook_21873900
Mumbai

#CDY
बालदिन विशेष. माझा नातु मौर्य !! सात वर्षाचा आहे तो प्रचंड 'फुडी' आहे.त्याला वेग वेगळे पदार्थ खायला खूप आवडतात.त्यामुळे त्याची आजीला काही ना काही फर्माईश असते.आजीही आपले दुखणे विसरुन त त्परतेने कामाला लागते.
मौर्य ला माझ्या हातचे चिझी बाईट्स खुप आवडतात.आज बालदिनाच्या निमित्ताने आणि त्याला भेटणार म्हणून आजीकडून 'सरप्राईज'आहे. चिझी बाईट्स!!!!

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

5-6 जणांसाठी
  1. 200 ग्राममैदा
  2. 3चिझ क्युब्ज
  3. 1/4 टीस्पूनऑरिगॅनो
  4. 1/2 टीस्पूनताजी क्रश मिरपूड
  5. 1/4 टीस्पूनचिली फ्लेक्स
  6. मीठ चवीनुसार
  7. तेल तळण्यासाठी
  8. दुध गरजेनुसार

कुकिंग सूचना

  1. 1

    मैदा चाळून घ्या.त्यात चिझ क्युब्ज किसून घाला.मिरपूड,ऑरीगॅनो, चिली फ्लेक्स, मीठ घालून गरजेनुसार दुध घालून घट्ट पीठ मळून घ्या.1/2 तास झाकून ठेवा.

  2. 2

    अर्ध्या तासाने पीठ मळून गोळे करून पोळपाटावर पातळ पोळी लाटून त्रिकोणी आकारात कापून घ्या.कापण्यापुर्वी काट्याने पोळीवर टोचे मारा.

  3. 3

    कढईत तेल तापवून मध्यम आचेवर तळून घ्या.गुलाबीसर तळा.

  4. 4

    आपले बालदिन विशेष (नातु स्पेशल) चिझी बाईट्स तयार आहे.आपणही आपल्या मुला/ नातवंडांना खुष करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pragati Hakim
Pragati Hakim @cook_21873900
रोजी
Mumbai

Similar Recipes