चाॅकलेट फज (chocolate fudge recipe in marathi)

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
Badlapur

#CDY

आठवतात ते दिवस बाबा आणून देत आईकडे चॉकटेलचा डब्बा मला लपून छपून...
आणि आईही ठेवी तो कोपऱ्यात मला लपून...
आई जेवल्यानंतर तुला गंमत देईन म्हणून भूरळ घाली...
मठामठा मग आईच्या हातचे घास मग माझ्या पोटात जाई...
आई मग ती गंमत डब्यातून काढी.....

मग मला वाटे जशी फिरवली की काय हिनी जादूची छडी...
मग मात्र माझी उत्सुकता शिगेला पोहचायची
घाई असायची मला कधी एकदा चॉकलेट खाऊन टाकायची...

दिवस सरले मी मोठी झाले..
अजूनही आठवतात त्या गोष्टी...
समोर जरी असले खूप साऱ्या चॉकलेट्स...
पण त्या चॉकलेटची चव या चॉकलेट्सना नाही...

चाॅकलेट शिवाय बालपण हे अपूर्णच नाही का ?😊 कोणतंही सेलिब्रेशन चाॅकलेट शिवाय पूर्ण होत होऊच शकत नाही...😊
प्रत्येक सेलिब्रेशनसाठी कुछ मिठा तो बनता है...😋😋
चला तर मग पाहूयात अशीच एक चाॅकलेटची झटपट बनणारी गमंत...😊

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१/२ तास
४ ते ५ जणांसाठी
  1. 1/2 लिटरफुल फॅट दूध
  2. 3/4 कपसाखर
  3. 2 कपडार्क चॉकलेट
  4. 1 टेबलस्पूनसाॅल्टेड बटर
  5. बदाम पिस्त्याचे काप
  6. बटर पेपर
  7. टिन

कुकिंग सूचना

१/२ तास
  1. 1

    एका भांड्यात दूध आणि साखर गरम करायला ठेऊन द्या.

  2. 2

    मिश्रण सतत ढवळत राहा. आणि कडेला लागलेली साय स्क्रेप करून घ्या.

  3. 3

    मिश्रण ३/४ होईपर्यंत आटवून घ्या. म्हणजेच आपण बासुंदी करण्यासाठी दूध आटवतो तसेच करायचे आहे ‌.

  4. 4

    तयार दाटसर दूध एका बाऊलमधे काढून घ्या. नंतर त्यात डार्क चॉकलेट,बटर घालून छान मिक्स करून घ्या.

  5. 5

    मिश्रण पूर्णपणे छान मिक्स झाल्यावर एका टिनमधे बटर पेपर लावून वरून हे तयार मिश्रण घालून छान पसरवून घ्या.वरून बदाम,पिस्त्याचे काप घालून मिश्रण थंड होऊ द्या. नंतर फ्रिजमध्ये २ तास ठेवा.नंतर आवडीप्रमाणे कट करून सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
रोजी
Badlapur
I'm passionate about Cooking, Baking & Chocolates Making..😊I love nature , traveling ,reading , drawing and love food photography..😊
पुढे वाचा

Similar Recipes