गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)

Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
Pune

#trending
हिंदी सिनेमातले एकदम माँ-बेटेके प्यारकी निशानी गाज्जरका हलुआ और पराठे तो पिक्चरमें होनेही चाहिए।😄तमाम हिरोंची आणि त्यांच्या निरुपारॉय किंवा रीमा लागू या आयांची फेवरेट पसंती....थंडीमधल्या वाढदिवस, लग्न,रिसेप्शन यातला कॉमन मेनू!माझ्या लेकाचा वाढदिवस डिसेंबरमध्ये असतो...त्याला कळायला लागेपर्यंत गाजर हलवा आणि मटार उसळ हाच मेनू ठरलेला😊आता मात्र याचा भाव कमी झालाय...ए आई,तुझा तो गाजर हलवा,मटार उसळ सोडून काहीही कर हं..अशी ऑर्डर मला ऐकावी लागते.कँरोटीनने भरपूर अशी ही गाजरे खरंचच भरपूर व्हिटॅमिनचा स्त्रोत आहेत.मुख्यत्वे डोळ्यांचे आरोग्य टिकण्यासाठी गाजरांचे सेवन फायदेशीर ठरते.गाजर हलवा सगळ्यांनाच आवडतो.मी प्रथम खाल्ला गाजरहलवा तो आमच्या शेजारी जोशी म्हणून रहात होते त्यांच्याकडे.नुकत्याच इंदोरहून बदलून आल्या होत्या,त्यांनी दिलेला गाजरहलवा मला फारच आवडला.त्यांना रेसिपी विचारली.मी असेन 13-14वर्षांची!तेव्हा गावरान छोटी छोटी गाजरं मिळत असत.आतासारखी मिळणारी गाजरं तेव्हा मिळायची नाहीत.नंतरनंतर ही दिल्ली गाजरंही मिळायला लागली,हलवाही करता येऊ लागला आणि वरचेवर तो होऊही लागला.....बघूया सोप्पा असा थंडी आणखी गुलाबी करणारा गाजर हलवा😋😋👍

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1तास
5-6व्यक्ती
  1. 1 किलोगाजरे
  2. 300 ग्रॅमखवा
  3. 2 टीस्पूनसाजूक तूप
  4. 1/2 कपदूध
  5. 1.5 कपसाखर
  6. 1 टीस्पूनवेलचीपूड
  7. 10-12बदाम
  8. 2 टीस्पूनबेदाणे

कुकिंग सूचना

1तास
  1. 1

    गाजराची साले काढून घ्यावीत.बुडखं आणि टोकं चिरावीत.फुडप्रोसेसरमध्ये गाजरे किसून घ्यावीत किंवा किसणीने किसावीत.शक्यतो मधला कडक भाग काढून टाकावा.

  2. 2

    कढईत साजूक तूप घालून गाजराचा कीस परतून घ्यावा.थोडा वेळ झाकण ठेवून गाजराचा कीस शिजू द्यावा.1/2कप दूध घालावे.म्हणजे थोडा ओलसरपणा राहून गाजर लवकर शिजते.

  3. 3

    या कीसावर आता ताजा खवा किसणीने किसून घालावा.गुठळ्या राहू देऊ नयेत.खवा घातल्यावर गाजरकीस एकजीव करावा.एक वाफ येऊ द्यावी.आता त्यावर साखर घालावी.साखर गोड कसे आवडते त्या आवडीप्रमाणे घालावी.साखर पूर्ण विरघळू द्यावी.हळूहळू मिश्रण घट्ट होऊ लागते.कडेला थोडे तूप सुटू लागले व घट्टपणा येऊ लागला की गँस बंद करुन वेलचीपूड आणि बदामाचे काप,बेदाणे घालावेत.

  4. 4

    बाऊलमध्ये गाजर हलवा काढून बदामकापांनी गार्निश करावे.एक मस्त असे थंडीतले पौष्टिक डेझर्ट हलकेसे कोमट करुन सर्व्ह करावे😋😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
रोजी
Pune
सदा सर्वदा योग कुकपँडचा घडावा ।कुकपँड कारणी नवा पदार्थ माझा घडावा ।आवडीने पदार्था सुगरणीने तो करुनी पहावा ।मने जिंकण्या मार्ग पोटातून जावा ।।
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes