काकडीचे थालीपीठ (kakadiche thalipeeth recipe in marathi)

Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
Vashi

#थालीपीठ
थालीपीठ हा महाराष्ट्राचा पारंपरिक पदार्थ आहे. एनवेळी बनवायचा , आणि केव्हाही खाता येणारा पदार्थ. सर्वांच्या आवडीचा आहे नीर निराळ्या प्रकारे बनवतात.

काकडीचे थालीपीठ (kakadiche thalipeeth recipe in marathi)

#थालीपीठ
थालीपीठ हा महाराष्ट्राचा पारंपरिक पदार्थ आहे. एनवेळी बनवायचा , आणि केव्हाही खाता येणारा पदार्थ. सर्वांच्या आवडीचा आहे नीर निराळ्या प्रकारे बनवतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30मिनिटे
4व्याकिंसाठी
  1. 2मध्यम आकाराच्या काकड्या
  2. 1 कपगव्हाचे पीठ
  3. 2 कपतांदूळ /ज्वारीचे पीठ
  4. 2 टेबलस्पूनआले लसूण मिरची पेस्ट
  5. 2 टेबलस्पूनकोथिंबीर
  6. 1 टेबलस्पूनजिरें
  7. 1/2 टेबलस्पूनहळद
  8. 1 टेबलस्पूनमीठ
  9. आवश्यकते नुसारतेल

कुकिंग सूचना

30मिनिटे
  1. 1

    काकडी स्वच्छ धुऊन साले काढून किसून घ्यावी

  2. 2

    पीठ चाळून घ्यावीत. कोथिंबीर स्वच्छ धुऊन चिरुन घ्यावी.

  3. 3

    किसलेल्या काकडीत पीठ घालून त्यात जिरें,आले, लसूण, मिरची पेस्ट, हळद, मीठ घालून पीठ मळून घ्यावे. पाणी अजीबात घालू नये

  4. 4

    प्लॅशटिक च्या पेपरवर किंवा कापडावर थालीपीठ थापून गॅसवर मध्यम आचेवर तव्यावर तेल घालून दोन्ही बाजूनी तांबूस रंग होई पर्यंत भाजून घ्यावे.

  5. 5

    काकडीचे खुसखुशीत थालीपीठ तयार. दही,लोणच्या बरोबर सर्व्ह करावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
रोजी
Vashi
मला पदार्थ बनवायला आणि खिलवायला आवडते.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes